Aastad Kale Angry Post : सिनेविश्वातील बरेच कलाकार हे प्राणीप्रेमी असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ही कलाकार मंडळी त्याच्या पाळीव प्राण्यांचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरुन शेअर करत असतात. तर बरेच प्राणीप्रेमी कलाकार हे एखाद्या संस्थेमार्फत या मुक्या जीवांना आधार देण्याचं काम करतात. सोसायटीमध्ये वावरत असताना या प्राणी-पक्ष्यांना होणाऱ्या त्रासावर अनेकदा ही कलाकार मंडळी आवाज उठवताना दिसतात. अशातच एका चिमुकल्या पिलांचा गेलेला जीव पाहून एका मराठमोळ्या अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आवाज उठवला आहे. हा अभिनेता म्हणजे आस्ताद काळे. आस्तादने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर थेट पोस्ट शेअर केली आहे.
आस्ताद आपल्या दमदार अभिनयामुळे व बेधडक वक्तव्यामुळे कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. आस्ताद अभिनय क्षेत्राबरोबरच सामाजिक व राजकीय घडामोडींबाबतही भाष्य करत असतो. बरेचदा आस्तादने भाष्य केलेल्या या पोस्टमुळे त्याला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे. मात्र या ट्रोलर्सला न जुमानता कायमच अभिनेता आपलं स्पष्ट मत मांडण्यात कधीच कचरला नाही. आस्तादने त्याच्या कलेच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं वर्चस्व निर्माण केलं.
आणखी वाचा – ब्रेकअप झालंच नाही; बॉयफ्रेंडबरोबरच राहते हिना खान, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “लग्न कर…”
सामाजिक मुद्द्यांवर कायमच रोखठोक बोलणाऱ्या आस्तादने एका श्वानाचा चारचाकी गाडीमुळे जीव गेल्याने आवाज उठवला आहे. बिल्डिंगच्या आवारात ही घटना घडली असल्याचं त्याने नमूद केलं आहे. यावेळी आस्तादने हा प्रकार ज्या व्यक्तीकडून घडला त्याच्या लायन्सन्सचा फोटो, मृत पिलांचा फोटो आणि चारचाकी गाडीचा फोटो शेअर केला आहे. आणि ही पोस्ट शेअर करत “कृपया मला सांगा की या व्यक्तीवर काय आणि कशी कारवाई केली जाऊ शकते”, असा सवालही विचारला आहे.
आस्तादच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत राग व्यक्त केला आहे. यावर अनेक कलाकारांनी कमेंट करत आस्तादला पाठिंबा दर्शविला आहे. अभिनेत्री मेघा धाडेने कमेंट करत, “FIR झाली का?”, असं विचारलं आहे. तर यावर आस्तादने उत्तर देत, “दुपारी जातोय. पल फाउंडेशनची लिगल टीम येत आहे”, असं म्हटलं आहे. पल फाउंडेशन ही प्राण्यांच्या विरोधात आवाज उठवणारी आणि त्यांना न्याय मिळवून देणारी संस्था आहे.