Tharla Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेत एका मागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत सध्या अर्जुन व सायली वेगळे झाले असल्याचे पाहायला मिळतंय. प्रियाने अखेर अर्जुन आणि सायलीचा पर्दाफाश केला आहे. मालिकेत प्रियाने अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य सगळ्यांसमोर आणल्याने संपूर्ण कुटुंब दोघांचाही राग राग करुन दोघांनाही वेगळं करतात आणि हे नाटक असल्याचे सांगतात. हे नाटक केल्याप्रकरणी कल्पना सायलीला थेट घराबाहेरच काढते. तेव्हा अर्जुनही तिच्याबरोबर जायला निघतो. तेव्हा मधु भाऊ सायलीला हाताला धरुन त्यांच्या घरी घेऊन जातात. मधु भाऊनाही सायलीचे हे वागणं पटलेलं नसतं.
तर इकडे अर्जुन सायली नसल्याने खूपच खचलेला असतो. चैतन्य त्याला वेळोवेळी आधार देण्याचा प्रयत्न करतो. घरातल्यांना ही नेमकंही दोघं असे का वागले हे कळत नाही. तर एकीकडे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात. आता सायली अर्जुन खरं प्रेमात पडले असल्याचं सांगितलं तर घरातले त्यांच्यावर विश्वास ठेवतील का यावरही या दोघांना शंका असते. मालिकेच्या अशातच समोर आलेल्या एका प्रोमोने साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, अर्जुन न राहून सायलीला सतत फोन करत असतो. सायली अर्जुनचा फोन घ्यायला फोन कडे धावून जाते तेव्हा मधु भाऊ फोन घेतात आणि तो फोन कट करतात. आणि सायलीला सांगतात की, जर तू पुन्हा अर्जुनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलास तर तू माझं मेलेलं तोंड पाहशील. हे ऐकताच सायली शांतच होते आणि ढसाढसा रडू लागते.
आणखी वाचा – आधी हिंदू आणि आता ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्नबंधनात अडकली कीर्ती सुरेश, पतीबरोबरचे रोमँटिक फोटो समोर
आता मधु भाऊंनी घातलेल्या या अटीमुळे सायली अर्जुन पासून दूर राहू शकेल का? सायली आणि अर्जुन पुन्हा एकत्र येतील का? त्यांच्यातला प्रेमाचा घरातील सगळेच मंडळी स्वीकार करतील का?, हे सारं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.