सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पूर्णा आजीच्या नावे सदाफुली लावली”, ‘ठरलं तर मग’ला ९०० भाग पूर्ण होताच सेटवर कलाकार भावुक, मालिकेच्या टीमसाठी तेजस्विनीची भावनिक पोस्ट

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 26, 2025 | 11:30 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
tejaswini pandit emotional

"पूर्णा आजीच्या नावे सदाफुली लावली", 'ठरलं तर मग'ला ९०० भाग पूर्ण होताच सेटवर कलाकार भावुक, मालिकेच्या टीमसाठी तेजस्विनीची भावनिक पोस्ट

tejaswini pandit emotional : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेली अडीच वर्ष सुरु असून रसिकांच्या मनावर राज्य करतेय. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळते. काल या मालिकेचे ९०० भाग पूर्ण झाले आहेत. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकेत पूर्णा आजीच्या भूमिकेत ज्योती चांदेकर यांनी उत्तम काम केले. ज्योती चांदेकर यांचं १६ ऑगस्ट २०२५ रोजी अचानक निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. तर मालिकेच्या संपूर्ण टीमवर दुःखाचा डोंगर कोसळला.

पूर्णा आजीला विसरु शकणार नाही, त्यांची जागा कोणीही घेऊ शकणार नाही अशा असंख्य प्रतिक्रिया मालिकेतील कलाकारांनी देत भावना व्यक्त केल्या. मालिकेचे ९०० भाग पूर्ण झाल्यानंतर हा आनंद साजरा करताना साऱ्यांना सेटवर पूर्णा आजींची उणीव भासत होती. यावेळी सेटवर पूर्णा आजी म्हणजेच ज्योती चांदेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मालिकेच्या टीमने त्यांच्या नावे सदाफुलीचे रोपटं लावत त्यांची आठवण काढली.

आणखी वाचा – सुखी, वैवाहिक आयुष्यासाठी करा हरतालिकेचे व्रत, जाणून घ्या या व्रतामागची कथा आणि शुभ मुहूर्त

मालिकेतील मुख्य अभिनेत्री सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “आज ‘ठरलं तर मग’चे ९०० भाग पुर्ण झाले. आज सेटवर केक कापून, आजीच्या नावाची सदाफुली लाऊन दिवस साजरा केला. ती हे बघायला हवी होती. पण तिचे आशीर्वाद नक्की आहेत. तिच्या अशा अचानक जाण्याने बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागल्या. सीन फिरवावे लागले. अजुनही आम्ही आणि कथानक यातून सावरतोय. पण तुम्ही जी साथ देताय त्याला सलाम. तुम्हाला जे बघायचंय ते लवकरच दिसेल. तोपर्यंत तुमचं प्रेम. तुमचा ‘ठरलं तर मग’ वरचा विश्वास. तुमची साथ अशीच राहुद्या.॥जय गुरुदेव दत्त॥”, अशी भावुक पोस्ट जुईने इंस्टाग्रामवर शेअर केली.

आणखी वाचा – प्रथमेश लघाटेचं कुटुंब बाप्पाच्या सेवेत मग्न, मुग्धाही गणेशाची मूर्ती रंगवण्यात व्यस्त, व्हिडीओ पाहताच संस्कारांचं कौतुक

जुईची ही भावनिक पोस्ट रिशेअर करत तेजस्विनी पंडितने मालिकेच्या सर्व कलाकारांना धीर दिला आहे. “तिच्या अचानक जाण्याने बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागल्या असतील पण, तिचं तुमच्यावर असलेलं प्रेम तसंच राहील- जुई आणि ठरलं तर मग मालिकेची संपूर्ण टीम”, असं तेजस्विनीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Tags: jui gadkarijyoti chandekartejaswini panditTharala tar mag
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
actor Dinesh Mangaluru death

'KGF' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या ५५ व्या वर्षी निधन, 'कांतारा'च्या शूटदरम्यान आलेला ब्रेन स्ट्रोक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.