actor Dinesh Mangaluru death : ज्येष्ठ कन्नड अभिनेते आणि निर्माते दिनेश मंगलुरु यांचे सोमवारी निधन झाले. माध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार अभिनेत्याने उडुपी येथील राहत्या घरी सकाळी साडेतीन वाजता अखेरचा श्वास घेतला. ‘केजीएफ’, ‘किचा’ आणि ‘किरीक पार्टी’ या प्रतिष्ठित कन्नड चित्रपटातील भूमिकांसाठी ते प्रसिद्ध होते. ते ५५ वर्षांचे होते. ‘केजीएफ’मध्ये त्यांनी बॉम्बे डॉनची भूमिका साकारली होती. स्थानिक प्रकाशन उदयवाणी नुसार, दिनेश यांना ‘कांतारा’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान स्ट्रोक आला होता.
बंगळुरूमध्ये उपचारानंतर ते बरे झाले होते, परंतु गेल्या आठवड्यात तब्येत बिघडल्याच्या तक्रारीनंतर त्यांना अजुदक्त सुगोन रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अहवालात असेही म्हटले आहे की, मेंदूच्या रक्तस्रावामुळे दिनेश यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि गेल्या एका वर्षापासून ते अस्वस्थ होते.
‘राणा विक्रम’, ‘अंबारी’, ‘सवारी’, ‘इंति निन्ना बेटी’, ‘आ डिंगी’ आणि ‘स्लम बाला’ यासारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण काम करत प्रसिद्धी मिळण्यापूर्वी अभिनेते अनेक चित्रपटांमध्ये कला दिग्दर्शक म्हणून काम करत होते. कला दिग्दर्शक म्हणून त्यांनी ‘प्रार्थना’, ‘तुगलक’, ‘बेट्टादा जीवा’, ‘सूर्य कांति’ आणि ‘रावण’ या चित्रपटात काम केले. मुख्य प्रवाहातील सिनेमात येण्यापूर्वी दिनेश थिएटरमध्ये काम करत होते.
आणखी वाचा – सुखी, वैवाहिक आयुष्यासाठी करा हरतालिकेचे व्रत, जाणून घ्या या व्रतामागची कथा आणि शुभ मुहूर्त
सोमवारी संध्याकाळी दिनेश यांचा मृतदेह बेंगळुरूला आणण्यात आला. अभिनेत्याच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून लग्गेरे येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे शरीर सार्वजनिक दर्शनासाठी ठेवले गेले. आज त्यांच्यावर अंतिम संस्कार सुमनहल्ली स्मशानभूमीत केले जाणार आहे. उडुपी जिल्ह्यातील कुंडापूरमध्ये जन्मलेला दिनेश बंगळुरूमध्ये बर्याच वर्षांपासून राहत होते. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा पवन, सजान आणि पत्नी भारती असा परिवार आहे.





