आजकाल जवळपास सर्वच तांत्रिक क्षेत्रांत ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ अर्थात ‘एआय’ वापरलं जात आहे. हे तंत्रज्ञान हळूहळू लोकांना त्यांची विविध कामं पूर्ण करण्यास मदत करत आहे. कंटेंट तयार करणं असो, नवीन गोष्टी शिकणं असो किंवा फोटो तयार करणं असो… ही सगळी कामं ‘एआय’च्या मदतीने केली जात आहेत. या मात्र ‘एआय’चा अनेक क्षेत्रात सदुपयोग आहे, पण अनेकजण या तंत्रज्ञानाचा चुकीचा वापरही करताना दिसून येतात. या तंत्रज्ञानाचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. यावर कठोर कारवाईची मागणीही अनेकांनी केली आहे. याचबद्दल आता आणखी एका अभिनेत्रीने आपली नाराजी व्यक्त केली आहे. (jui gadkari angry on misuse of AI technology)
‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. जुई गडकरी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट्स, शूटिंगच्या सेटवरची धमाल, ‘ठरलं तर मग’ मालिकेचे प्रोमो ती नेहमी शेअर करते. तसंच सोशल मीडियाद्वारे ती अनेकदा विविध विषयांवर भाष्यही करते. अशातच तिने ‘एआय’ तंत्रज्ञानावर तिची नाराजी व्यक्त केली आहे. जुईच्या एका फोटोशूटचा वापर करुन तिच्या ऐवजी एका वेगळ्याच स्त्रीचा फोटो लावल्याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे आणि या व्हिडीओसह तिने असं कृत्य करणाऱ्यांवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – रस्त्यांची परिस्थिती पाहून ‘तुला शिकवीन…’ फेम अभिनेत्याची खोचक पोस्ट, म्हणाले, “वर्षानुवर्षे…”
जुई गडकरीचे जांभळ्या रंगाच्या साडीतील फोटो एका नेटकऱ्याने वापरत जुईच्या चेहऱ्याऐवजी एका वेगळ्याच स्त्रीचा लावला आहे आणि एक व्हिडीओ बनवला आहे. हाच व्हिडीओ जुईने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केला आहे आणि असं म्हटलं आहे की, “एआयचा गैरवापर. असे दुसऱ्याचे फोटो वापरणे चांगले नाही”. ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या गैरवापर करत अनेक अभिनेत्रींचे अश्लील व मॉर्फ केलेले फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. रश्मिका मंदाना, कतरीना कैफ व आलिया भट्ट यासह अनेक अभिनेत्री डीपफेकला बळी पडल्या आहेत.
दरम्यान, आता या एआयच्या चुकीच्या वापराबद्दल जुईनेही तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने ‘पुढचं पाऊल’ नंतर जुई अनेक मालिकांमध्ये दिसली होती. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘वर्तुळ’, ‘सरस्वती’ या मालिकांमध्ये ती झळकली. ‘बिग बॉस मराठी’मध्येही जुई सहभागी झाली होती. सध्या ती ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे आणि या मालिकेतील तिची भूमिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे