रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तू फसवलंस…”, पूर्णा आजीच्या निधनाने सायलीला धक्का, तर अर्जुनलाही अश्रू अनावर, म्हणाला, “आमच्यात नाहीस…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 16, 2025 | 11:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
jyoti chandekar passed away

“तू फसवलंस…”, पूर्णा आजीच्या निधनाने सायलीला धक्का, तर अर्जुनलाही अश्रू अनावर, म्हणाला, "आमच्यात नाहीस…"

jyoti chandekar passed away : ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले असल्याच समोर आलं. ज्योती यांच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. आणि अखेर आजारपणाशी त्यांची झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांची दुपारी ४च्या सुमारास प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानगृहात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेत ज्योती चांदेकर महत्त्वपूर्ण भूमिकेत कार्यरत होत्या. पूर्णा आजी या पात्रामुळे त्यांना घराघरात लोकप्रियता मिळाली.

‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे त्या साऱ्यांच्या मनावर राज्य करताना दिसल्या. या मालिकेतील सायली ही मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरीने ही ज्योती यांच्या निधनानंतर भावुक पोस्ट शेअर केली आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर पूर्णा आजीबरोबरचा फोटो शेअर करत, “तुझं असं जाणं मी स्वीकारू शकत नाही, आजी तू फसवलंस”, असं कॅप्शन देत ती भावुक झाल्याचे दिसते.

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा

तर अर्जुन म्हणजेच अमित भानुशालीनेही भावनिक पोस्ट शेअर केली. ज्योती यांच्याबरोबरचा फोटो पोस्ट करत तो म्हणाला, “अजूनही विश्वास बसत नाही की तू आता आमच्यात नाहीस पूर्णा आजी… तुझी खूप आठवण येईल. तू माझ्यासाठी फक्त सहकलाकार नव्हतीस, तर एक शिक्षिका, एक गुरु होतीस. ज्यांनी मला फक्त अभिनय किंवा परफॉर्मन्स नाही तर जीवनावर प्रेम करायला शिकवलं. तुझं आयुष्य जगण्याचं बिंधास्त आणि आनंदी तत्त्वज्ञान नेहमी माझ्यासाठी प्रेरणा राहील. तुझा हसरा चेहरा, तुझा उत्साह, आणि प्रत्येक क्षण मनापासून जगण्याची तुझी पद्धत कायम आठवत राहील. शांती लाभो आजी… तुझ्या गोड आठवणी आणि शिकवणी कायम हृदयात जपून ठेवेन”.

आणखी वाचा – सावधान! तुम्ही दररोज नेलपॉलिश लावता का?, तुमची नखं खराब होतीलच पण शरीरालाही मोठा धोका, वाचा सविस्तर

View this post on Instagram

A post shared by Amit Bhanushali (@aamit.bhanushali)

मालिकेत पूर्णा आजी आणि सायली यांचं ऑनस्क्रीन बॉण्डिंग चांगलं नसलं तरी ऑफस्क्रीन मात्र त्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. पूर्णा आजीकडून म्हणजे ज्योती यांच्याकडून जुईने अभिनयाचे, माणूस म्हणून जगण्याचे अनेक धडे घेतले. पूर्णा आजी यांचा सेटवरील वावरही बऱ्यापैकी असल्याच पाहायला मिळालं. जुईच्या बीटीएस व्हिडीओमध्ये त्या नेहमीच दिसायच्या. यावरुन जुई आणि ज्योती यांचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग पाहायला मिळायचं. आता मात्र ज्योती चांदेकर यांच्या निधनाच्या बातमीने मालिकेतील सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
jyoti chandekar passed away

'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध पडलेल्या आणि…; गेल्यावर्षी आजारपणानंतर केलेलं मालिकेत कमबॅक, आता मात्र आजारपणाशी झुंज अपयशी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.