शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझी आई मला आणून द्या”, आईच्या निधनानंतर तेजस्विनी पंडितने पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना, दुःखातून सावरणं झालंय कठीण…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 20, 2025 | 11:45 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tejaswini Pandit emotional

"माझी आई मला आणून द्या", आईच्या निधनानंतर तेजस्विनी पंडितने पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना, दुःखातून सावरणं झालंय कठीण…

Tejaswini Pandit emotional : आई-मुलीचं नातं हे नेहमीच खास आहे. आईबरोबरचे नाते नेहमीच स्पेशल असते. आईबरोबर आपण बरेचदा भांडतो, चिडतो मात्र किती काही झालं तरी या नात्यामध्ये दुरावा येणं कठीण. प्रत्येक लेक आपल्या आईसाठी धडपड करत असते. तिचे आरोग्य उत्तम असावं म्हणून ती नेहमीच प्रार्थना करताना दिसते. सिनेसृष्टीत तर अशा अनेक आई-मुलीच्या जोड्या आहेत जे उदाहरण ठरतील. यापैकी एक म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर आणि त्यांची लेक अभिनेत्री तेजस्विनी पंडित. ज्योती व तेजस्विनी ही मायलेकींची जोडी नेहमीच साऱ्यांची आवडती राहिली.

१६ ऑगस्ट रोजी ज्योती चांदेकर यांचे अकस्मात निधन झाले. आज त्यांना जाऊन चार दिवस झाले असले तरी त्यांचे असे हे अचानक जाणे खरं वाटत नाही आहे. ज्योती यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीला खूप मोठा धक्का बसला. ज्योती यांच्या निधनाने त्यांची लेक तेजस्विनी पंडित पूर्णतः कोलमडली. आईचे असे अचानक जाणे तिला सहन झाले नाही. अंत्यसंस्कारावेळी तर तिच्या अश्रूंचा बांध फुटला. आईला मुखाग्नी देताना ती धायमोकलून रडताना दिसली.

आणखी वाचा – लग्नाआधी नवऱ्यासह देवदर्शनामध्ये रमली प्राजक्ता गायकवाड, थेट पंढरपुरात जात विठुरायाचं घेतलं दर्शन, फोटोंनी वेधलं लक्ष

यानंतर आता तेजस्विनीने आईच्या निधनानंतर एक कविता रिपोस्ट करत भावना व्यक्त केलेल्या पाहायला मिळत आहेत. “काय काय समजून घेऊ, तुम्हीच घ्या समजून मला, एका दिवसासाठी माझी आई मला आणून द्या”, ही कविता तिने पोस्ट केली आहे. यावरुन तेजस्विनी अद्याप आईच्या जाण्यातून सावरलेली नसल्याचं स्पष्ट होत आहे. तेजस्विनीने तिच्या आईच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली.

आणखी वाचा – “Show must go on म्हणणं सोपं आहे?”, पूर्णा आजींना जाऊन चार दिवस होताच जुई गडकरीला येतेय आठवण, भावुक होत म्हणाली, “शेवटचा व्हिडीओ…”

तेजस्विनीला अनेकांनी खंबीर राहण्यास सांगितले आणि काळजी घेण्यासही सांगितले. आईच्या निधनाची बातमी शेअर करत तेजस्विनी म्हणाली, “नमस्कार, कळवण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, मनमुराद जगणारी आणि दिलखुलास हसणारी आमची आई तसंच सर्वांची लाडकी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती ज्योती चांदेकर पंडित यांचं वयाच्या ६९ व्या वर्षी आज १६ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झालं आहे. त्यांचे अंत्यसंस्कार उद्या, १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता, नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमी, पुणे इथं होणार आहेत”, अशी पोस्ट तिने लिहिली आहे. ज्योती चांदेकर यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Tags: emotional postJyoti chandekar deathtejaswini pandit
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
aai kuthe kay karte fame actress

व्हायरल ताप, पाठदुखी आणि…; मालिका संपल्यानंतरही 'आई कुठे…' फेम अभिनेत्री रमली शूटिंगच्या आठवणीत, म्हणाली, मुसळधार पावसात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.