शुक्रवार, ऑगस्ट 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घटस्फोटाच्या तीन महिन्यांतच मराठी अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, केळवणाचा व्हिडीओ समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 22, 2025 | 12:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shubhangi Sadavarte kelvan

घटस्फोटाच्या तीन महिन्यांतच मराठी अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, केळवणाचा व्हिडीओ समोर

Shubhangi Sadavarte kelvan  : ‘संगीत देवबाभळी’ फेम अभिनेत्री शुभांगी सदावर्तेने काही महिन्यांपूर्वीच घटस्फोटाची बातमी दिली. अभिनेत्रींच्या घटस्फोटाची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरताच साऱ्यांना खूप मोठा धक्का बसला. यानंतर आता अभिनेत्रीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. घटस्फोटानंतर काही महिन्यांतच शुभांगी पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे.शुभांगी सदावर्ते आता दुसऱ्यांदा लग्न करत आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबरचा केळवणाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. शुभांगीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

घटस्फोटानंतर आता शुभांगी पुन्हा एकदा तिच्या आयुष्याची नवी सुरुवात करत आहे. केळवणाचा व्हिडीओ पाहून हे समोर आलं. शुभांगीच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव सुमित म्हशेळकर आहे. “जुळली गाठ गं”, असं कॅप्शन देत शुभांगीने हा केळवणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. शुभांगी आणि तिचा होणारा नवरा सुमितच्या केळवणाचा थाट त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी घातला.

आणखी वाचा – “तू चांगल्या घरातली दिसतेस इथे थांबू नकोस”, जुई गडकरीने सांगितला ऑडिशनचा धक्कादायक अनुभव, म्हणाली, “एकही माणूस दिसत नव्हता आणि..”

View this post on Instagram

A post shared by Shubhangi Sadavarte (@shubhangisadavarte)

तर सुमित म्हशेळकरने “नवराई माझी नवसाची”, असं कॅप्शन देत हा केळवणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. आणि त्यांच्या मित्र परिवाराचे आभार मानले आहेत. ‘संगीत देवबाभळी’ या संगीत नाटकातील आवलीच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या शुभांगीने संगीतकार आनंद ओकसह लग्नगाठ बांधली होती. मात्र ३ सप्टेंबर २०२५ ला त्यांनी घटस्फोटाची घोषणा केली.

आणखी वाचा – प्रॉडक्शन हाऊसच्या उद्धट वागणुकीवर गार्गी फुले भडकल्या, म्हणाल्या, “माजखोरपणा करून लायकी दाखवणार असाल…”

११ जुलै रोजी शुभांगी आणि आनंद यांनी करोना काळात लग्न केले. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर शुभांगी आणि आनंद या दोघांचा छोटेखानी विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला सदावर्ते आणि ओक कुटुंबातील मोजके नातेवाईक आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित होती. आता घटस्फोटानंतर तीन महिन्यांतच शुभांगी दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याचं समोर आलं आहे.

Tags: shubhangi sadavartewedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Manjar Movie Poster Onkar Bhojane in lead role
Entertainment

तीन मित्र अन् मोठा गोंधळ; ‘मांजर’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, १८ सप्टेंबरला उलगडणार…

ऑगस्ट 13, 2026 | 5:18 pm
Swara Bhasker breaks silence on being trolled
Entertainment

“मुस्लिमाशी लग्न करून तुम्ही लठ्ठ आणि कुरुप झालात का?”, ट्रोलिंगवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, “सेक्सी मुली…”

ऑगस्ट 12, 2026 | 10:19 am
Sunday 1996 Marathi Movie
Entertainment

‘संडे १९९६’ मध्ये कोकणाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर रहस्याचा थरार, ओंकार राऊतचा अनोखा अंदाज

ऑगस्ट 11, 2026 | 5:17 pm
 Hina khan husband
Entertainment

“तू दुस-याशी लग्न कर”, लग्नाआधी हिना खानने पतीला घातलेली ‘ही’ अट, कॅन्सर झाल्यानंतर करणार होती प्रेमाचा त्याग

ऑगस्ट 11, 2026 | 11:52 am
Next Post
Aditi Sarangdhar

"आमच्या एका मावशींच्या हातून…", मराठी अभिनेत्रीने सांगितला स्वामींचा अनुभव, म्हणाली, "रडत रडत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.