jui gadkari removed from serial : अभिनेत्री जुई गडकरीने आजवर तिच्या प्रत्येक अभिनयाने रसिकांच्या मनात घर केलं आहे. जुईचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. जुई सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे चर्चेत आली आहे. या मालिकेआधीही जुईने केलेल्या प्रत्येक मालिकेतील भूमिकेने प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळवलं. ‘श्रीमंत पेशवा बाजीराव – मस्तानी’ ही जुईची पहिली मालिका आहे. ही मालिका सुरु असताना जुईला आणखी एका मालिकेची ऑफर आली. मात्र या दुसऱ्या मालिकेदरम्यान जुईला खूप वाईट अनुभव आला. या मालिकेसाठी जुईला खुप मोठा त्रास सहन करावा लागला. हा वाईट किस्सा जुईने स्वतःच शेअर केला आहे.
जुईने ‘सकाळ’ या वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखातून तिला आलेला हा वाईट अनुभव चाहत्यांसह शेअर केला. जुईची दुसरी मालिका होती आणि व्यक्तिरेखा इतकी महत्त्वाचीही नव्हती. तेव्हा ‘बाजीराव मस्तानी’चं शूटिंग कर्जतलाच सुरु असल्याने इतर शूटिंगला कर्जतवरुनच प्रवास तिला करावा लागायचा. त्यामुळे पहाटेच्या लोकलनं लागायचं. पावसाळ्याच्या दिवसांत लाइट गेली होती आणि तिच्या मोबाईलची बॅटरी लो होती. रात्री ११.३०च्या शूटचा कॉलटाईम आला नव्हता. साधारण अडीच-तीनला लाइट आली, तेव्हा तिने फोन चार्जिंगला लावला, आणि तेव्हा तिला कळलं की, सकाळी साडेसहाला आरे कॉलनीत स्टुडिओमध्ये पोहचायचं होतं. जुईची झोपच उडाली. आरेमध्ये साडेसहाला पोहचायचं म्हणजे कर्जतवरून चारची लोकल पकडावीच लागते. जुई तेव्हा झोपलीच नाही, सगळं आवरून ती शूटला गेली. तारीख होती ७.७.२०१०! तिच्या वाढदिवसाच्या आदला दिवस. सातच्या शिफ्टला साडेसहाचा कॉलटाइम म्हणजे तुमचा सीन पहिला आहे आणि तो साधारण साडेसातपर्यंत सुरु व्हायला हवा हा सरळ हिशोब असतो.
आणखी वाचा – सूरज चव्हाण चढणार बोहोल्यावर, कोकणहार्टेड गर्लने शेअर केला पत्नीबरोबरचा फोटो, लवकरच…
पटापट तयार होऊन जुईने स्क्रिप्ट पाठ केली आणि कधी बोलवतील याची वाट बघत राहिली. आठ वाजले, दहा वाजले, तिला बोलवलंच नाही. इतरांचेच सीन सुरु होते. दुपारचा ब्रेक झाला… संध्याकाळचा ब्रेक झाला… तरी बोलावणं आलंच नाही. संध्याकाळचे साधारण सात वाजले होते. जुईने घाबरतच तिथल्या असिस्टंट डायरेक्टरला विचारायची हिंमत केली, की माझा सीन कधी लागणार? त्यावर तो म्हणाला ‘माहीत नाही.’ जुईला टेन्शन वेगळंच आलं होत. कर्जत गाठायचं होतं मला. साडेआठ वाजले. तिने डायरेक्टरला विचारलं. त्यावर त्यांनी उत्तर दिलं, “लागेल लागेल. तुझा सीन कधीतरी नक्की लागेल”, आणि त्या वाक्यावर सगळे हसायला लागले. शेड्युलरला विचारलं तर तो म्हणाला, “माहीत नाही. सगळा गोंधळ झालाय शेड्युलचा. तू प्रॉडक्शन ईपीला विचार”.
आणखी वाचा – यंदाच्या नवरात्रीत देवी दुर्गाला प्रसन्न करण्याचे १० खात्रीशीर मार्ग, सर्व संकट दूर होतील आणि…
साधारण रात्रीचे ११ वाजले होते. ईपी सेटच्या बाहेर उभे होते. त्यांचं वय साधारण ५० असेल. त्या माणसाला मी कधीच नीट बोलताना बघितलं नव्हतं. सतत चेहऱ्यावर काहीतरी बिनसलेलं दिसायचं. बाहेर इतरही तीन सीरियलची शूट सुरू होती. त्यात प्रामुख्यानं आठवते ती ‘पवित्र रिश्ता’. जुईने जाऊन ईपीला विचारलं. घाबरतच.. “सर, माझा सीन होणार आहे का?” वाक्य पूर्ण होण्याआधीच त्या माणसानं टिपेचा सूर लावत आग ओकायला सुरुरवात केली. “व्हॉट द हेल डू यू थिंक ऑफ योरसेल्फ? नितीन देसाईकडे काम करतेस तर स्वतःला मोठी अॅक्ट्रेस समजायला लागलीस का?” मी हादरलेच. मी अर्धवट शब्द बोलत होते, ‘सकाळी आले.. अजून एकही सीन. कर्जत. शेवटची लोकल”, त्यावर परत ते गरजले, “तुझ्यासारख्या मुलीनं जॉब करायला हवा. अक्कल आहे का कोणत्या फील्डमध्ये आहेस?”.
आणखी वाचा – जानकीने ऐश्वर्याला धक्के मारत बाहेर काढलं आणि…; पलटवार की नवा डाव?, ‘घरोघरी…’ मालिकेत मोठा ट्विस्ट
हे ऐकून जुईला रडू कोसळलं, आणि त्यांनी लेखकाला बोलवून थेट सांगितलं, “आय डोंट वॉट टू सी धिस गर्ल ऑन माय सेट. चॉप ऑफ हर ट्रॅक”. यावर जुई ब्लँक झाली. त्यांनी जुईला मालिकेतून काढलं याचा तिला खरंतर आनंद झाला होता. खूप मोकळं वाटत होतं. शेवटची लोकल गेलेली होती. जुईने एक्सप्रेसनं कल्याण स्टेशन गाठलं आणि सकाळची पहिली ट्रेन येईपर्यंत ती रडली. तिचा तोवर वाढदिवस सुरू झाला होता. स्टेशनवरचे सगळेच तिच्याकडे बघत होते. काही दिवसांनी परत त्या मालिकेत बोलावलं गेलं; पण त्यांना जुईने सांगितलं, की आता नाही जमणार. काही दिवसांनी सगळं विसरून ती काम शोधायला लागली. आणि जुईला ‘पुढचं पाऊल’ची ऑफर आली. प्रोमो शूट झाल्यानंतर लोकेशनचा पत्ता आला. लोकेशन होतं तेच. आरेमधला स्टूडियो. तिथे पोहोचताच तिच्या अंगावर शहारे आले आणि देवाची कृपा म्हणजे तिचा अपमान ज्या ठिकाणी झाला होता त्या स्पॉटला तिच्या एकटीसाठी व्हॅनिटी लागली होती. देवाचे आभार मानत जुईने भरल्या डोळ्यांनीच व्हॅनिटीची पायरी चढली आणि तीने पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही”.





