रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“निगेटिव्ह कमेंट्सकडे दुर्लक्ष आणि…”, प्रेग्नंसीनंतर तीन महिन्यांतच ‘ठरलं तर मग’ अभिनेत्रीची शूटला सुरुवात, फोटो शेअर करत म्हणाली…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 14, 2025 | 4:08 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Monika Dabade Post

"निगेटिव्ह कमेंट्सकडे दुर्लक्ष आणि…", प्रेग्नंसीनंतर तीन महिन्यांतच 'ठरलं तर मग' अभिनेत्रीची शूटला सुरुवात, फोटो शेअर करत म्हणाली…

Monika Dabade Post : कलाकार मंडळी नेहमीच त्यांच्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. आजवर अशी अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांनी त्यांच्या अभिनयासाठी अहोरात्र मेहनत केली आहे. ही कलाकार मंडळी बरेचदा घरापासून दूर राहत शूटिंग करतात. काहीवेळेस महिनोंमहिने त्यांना घरापासून दूर राहावं लागतं. बरेचदा ही मंडळी सेट जवळ असेल तर ये-जा करतात. काही अभिनेत्री तर गरोदरपणानंतर लगेचच कामाला सुरुवात करतात. अनेकदा घर-काम सांभाळण्यात त्यांची तारांबळ उडते मात्र कुटुंबाचा खंबीर पाठिंबा असला तर या अभिनेत्रींना हे सहज शक्य होते. बरेचदा अडचणीच्या वेळेत ही कलाकार मंडळी त्यांच्या मुलांना सेटवरही घेऊन येतात.

काही महिन्यांपूर्वी आई झालेल्या मोनिका दाबाडेनेही नुकतीच तिच्या लेकीसह मालिकेच्या सेटवर हजेरी लावली. मोनिका स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेत अस्मिता ही भूमिका साकारत आहे. गरोदरपणाच्या वेळी मोनिकाने मालिकेतून ब्रेक घेतला होता, आणि ती तिच्या नवऱ्याच्या घरी जात असल्याचे दाखविण्यात आले होते. आता लेकीच्या जन्मानंतर मोनिका पुन्हा एकदा कामावर परतली आहे.

आणखी वाचा – कर्करोगावरील शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करची पहिली पोस्ट, डॉक्टर, नर्सचे मानले आभार, म्हणाली, “११ दिवस कठीण होते परंतु…”

View this post on Instagram

A post shared by Monika Dabade (@mostly_monika)

सोशल मिडियावर मालिकेच्या सेटवरील फोटो शेअर करत तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. “आवडत्या लोकांबरोबर, जगातल्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीला घेऊन, आवडतं काम करायला मिळणं, यासाठी भाग्य लागतं. तुमच्या सगळ्यांमुळे हे शक्य होत आहे. आणि नकारात्मक कामाकडे दुर्लक्ष, आपल्या आपल्या कामाकडे लक्ष”, असं कॅप्शन देत तिने ही गुडन्यूज दिली. यावेळी चित्रीकरणासाठी गेलेली मोनिका एकटीच सेटवर गेली नाही तर तिच्या तीन महिन्याच्या लेकीलाही घेऊन गेली. लेकीबरोबरचे सेटवरचे फोटो तिने पोस्ट केले आहेत.

आणखी वाचा – करिष्मा कपूरच्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या अंत्यसंस्कारात अडथळा, २४ तास उलटूनही पार्थिव भारतात पोहोचले नाही, कारण…

१५ मार्च रोजीला मोनिका दाबाडेने लेकीला जन्म दिला. त्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी लेकीला गोंडस नाव दिलं. मोनिका दबाडेने लेकीला ‘वृंदा’ असं नाव दिलं आहे. बारशाचा फोटो शेअर करत मोनिकाने एक पोस्ट देखील केली होती. वृंदा म्हणजे पवित्र तुळस… तुमच्या सर्वांचे प्रेम असेच कायम राहू द्या अशी नावाच्या अर्थाची पोस्ट तिने शेअर केली होती.

Tags: entertainmentmarathi actressmonika dabade
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Dipika Kakar Health

कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करच्या तब्येतीत सुधारणा, आनंदाची बातमी दिली पण धोका टळला नाही, काही दिवसांतच…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.