शुक्रवार, ऑगस्ट 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करच्या तब्येतीत सुधारणा, आनंदाची बातमी दिली पण धोका टळला नाही, काही दिवसांतच…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 14, 2025 | 5:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dipika Kakar Health

कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करच्या तब्येतीत सुधारणा, आनंदाची बातमी दिली पण धोका टळला नाही, काही दिवसांतच…

Dipika Kakar Health : दीपिका कक्कर गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी लढा देत आहे. अभिनेत्रीला स्टेज 2 यकृत कर्करोग होता, ज्याच्यावर आता शस्त्रक्रिया करण्यात आली आहे आणि अभिनेत्री आता घरी परतली आहे. दीपिका कक्कर पूर्णपणे ठीक आहे आणि घरी पोहोचल्यानंतर तिने तिच्या आरोग्याबाबत अपडेट दिले आहेत. दीपिकाला शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, जिथे ती एका आठवड्यापेक्षा जास्त काळ राहिली. दीपिकाने सांगितले की ट्यूमर तिच्या यकृतामधून काढला गेला आहे, परंतु तरीही उपचारांची आवश्यकता आहे.

दीपिका कक्कर यांनी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर इस्पितळातील काही छायाचित्रे शेअर केली आहेत आणि रुग्णालयात दिवसरात्र तिची काळजी घेणाऱ्या आणि उपचारात गुंतलेल्या डॉक्टर, कर्मचारी आणि परिचारिकांचे आभार मानले. एका फोटोमध्ये, दीपिका हॉस्पिटलच्या पलंगावर बसली आहे आणि ती हसत आहे. दुसर्‍या दोन फोटोंमध्ये ती नर्स आणि हॉस्पिटलचे डॉक्टर यांच्यासह फोटो घेत त्यांचे आभार मानताना दिसत आहे.

आणखी वाचा – करिष्मा कपूरच्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या अंत्यसंस्कारात अडथळा, २४ तास उलटूनही पार्थिव भारतात पोहोचले नाही, कारण…

View this post on Instagram

A post shared by Dipika (@ms.dipika)

दीपिकाने लिहिले आहे की, “११ दिवस झाले आहेत आणि आता मी घरी आले आहे. ट्यूमरपासून मी मुक्त झाले आहे परंतु हा उपचारांचा एक भाग आहे, उर्वरित उपचार येत्या काळातच असतील. आणि मला खात्री आहे की मी आधी म्हटल्याप्रमाणे मी यावर मात करीन. हे ११ दिवस कठीण होते, परंतु आपल्या सभोवतालच्या आश्चर्यकारक लोकांमुळे हे सहजपणे शक्य झाले. परंतु कोकिलाबेन इस्पितळातील प्रत्येकाने खूप कळकळ दर्शविली आणि सर्वांची काळजी घेतली. माझे सर्वात मोठे सामर्थ्य म्हणजे आपल्या सर्वांचे आशीर्वाद, प्रेम आणि समर्थन. अगदी मनापासून धन्यवाद. प्रत्येकाच्या प्रेमाने खूप धैर्य मिळाले”.

आणखी वाचा – कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्कर रुग्णालयातून घरी परतली, लेकाला घट्ट मिठी मारली आणि…; नवऱ्याचा हात धरुन…

दीपिकाचा नवरा शोएब इब्राहिम यांनी व्हीलॉगमध्ये सांगितले की, “सध्या सर्व काही ठीक आहे. फक्त एक मैलाचा दगड आम्ही पार केला आहे. पुढे बर्‍याच गोष्टी आहेत ज्या पाहिल्या जातील. शोएबने सांगितले की दीपिकाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे आणि आता ती बरी होत आहे. दीपिकाच्या पोटात दुखू लागलं तेव्हा तिला इस्पितळात नेण्यात आलं आणि तपासणी केली. तेव्हा यकृतामध्ये ट्यूमर आढळून आला. त्या ट्यूमरचे परीक्षण केल्यावर असे आढळले की, त्यात कर्करोग आहे. शस्त्रक्रिया त्वरित आवश्यक होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि ११ दिवसानंतर दीपिका कक्कर रुग्णालयातून घरी परतली आहे’.

Tags: CancerDipika Kakar Healthhealth
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Manjar Movie Poster Onkar Bhojane in lead role
Entertainment

तीन मित्र अन् मोठा गोंधळ; ‘मांजर’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, १८ सप्टेंबरला उलगडणार…

ऑगस्ट 13, 2026 | 5:18 pm
Swara Bhasker breaks silence on being trolled
Entertainment

“मुस्लिमाशी लग्न करून तुम्ही लठ्ठ आणि कुरुप झालात का?”, ट्रोलिंगवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, “सेक्सी मुली…”

ऑगस्ट 12, 2026 | 10:19 am
Sunday 1996 Marathi Movie
Entertainment

‘संडे १९९६’ मध्ये कोकणाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर रहस्याचा थरार, ओंकार राऊतचा अनोखा अंदाज

ऑगस्ट 11, 2026 | 5:17 pm
 Hina khan husband
Entertainment

“तू दुस-याशी लग्न कर”, लग्नाआधी हिना खानने पतीला घातलेली ‘ही’ अट, कॅन्सर झाल्यानंतर करणार होती प्रेमाचा त्याग

ऑगस्ट 11, 2026 | 11:52 am
Next Post
Govinda Net Worth

इतक्या कोटींचा मालक आहे गोविंदा, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.