मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ठरलं तर…’मध्ये अर्जुनचा हटके लूक, कथेत येणार मोठा ट्विस्ट, पुराव्यासाठीची मेहनत आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 16, 2025 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
tharala tar mag

'ठरलं तर…'मध्ये अर्जुनचा हटके लूक, कथेत येणार मोठा ट्विस्ट, पुराव्यासाठीची मेहनत आणि…

tharala tar mag : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका झाली आहे. या मालिकेने आजवर रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. गेले अनेक दिवस ही मालिका रसिकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांमध्ये स्वतःच असं स्थान निर्माण केलं आहे. सायली अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोळ्यावर उचलून धरलं आहे. याशिवाय इतरही कलाकार त्यांच्या भूमिकांमुळे प्रसिद्धीझोतात आहेत. ही मालिका सुरु झाल्यापासून टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळते. मालिकेच्या कथानकात नेहमीच नवनवीन ट्विस्ट आलेले पाहायला मिळतात.

मालिकेत गेल्या दोन वर्षांपासून चालत असलेल्या कोर्ट ड्रामाने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं आहे. ज्यामुळे वात्सल्य आश्रमाच्या केसचा निकाल लागण्यासाठी आता अवघे १५ दिवस उरले आहेत. सध्या मालिकेत जास्तीत जास्त पुरावे शोधण्यासाठी अर्जुन आणि सायली धडपड करताना दिसले. मात्र हवेतसे पुरावे हाती न लागल्यामुळे अवघ्या १५ दिवसांत सगळ्या गोष्टी कशा मार्गी लावायच्या या विचारात अर्जुन पाहायला मिळतोय.

आणखी वाचा – लग्न टिकून राहावं म्हणून दुसऱ्याच व्यक्तीशी संबंध, चार लग्न अन्…; कबीर बेदींचं आयुष्य पुन्हा चर्चेत, ओपन मॅरेजचा निर्णय घेऊन…

View this post on Instagram

A post shared by Tharla_Tar_Mag_ (@tharal_tar_mag_)

आश्रमात सापडलेलं साक्षीचं अर्ध पेंडंट आणि कॉल डिटेल्स हे दोन्ही पुरावे कोर्टात सादर केल्यावर निकाल नक्की फिरेल? याची खात्री मात्र अर्जुन-सायलीला असते. तर याच संदर्भात साक्षीच्या घरातील सर्वात महत्त्वाचा पुरावा शोधण्यासाठी आता अर्जुन एक वेगळंच रुप घेणार आहे. पिकलेले लांब केस, मोठी दाढी असा वेगळाच लूक करुन अर्जुन साक्षी शिखरेच्या घरी जाणार आहे.साक्षीच्या आईची पुण्यतिथी असते, याचदरम्यान गुरुजींच्या वेशात अर्जुन साक्षी-महिपतच्या घरी आलेला दिसतो.

आणखी वाचा – अंकिता लोखंडेच्या चमकदार त्वचेचं रहस्य आहे तरी काय?, चांदीचा ग्लास, मॅजिक वॉटर आणि…

यावेळी त्याठिकाणी प्रिया देखील उपस्थित असते. मात्र, अर्जुन वेगळ्या रुपात साक्षीच्या घरी आल्याने कोणीही त्याला ओळखू शकत नाही.आता अर्जुनच्या हाती साक्षीच्या विरोधात अजून काही ठोस पुरावा लागणार का? की त्याआधीच प्रिया त्याला ओळखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या आश्रम केससंदर्भातील महत्त्वाचा पुरावा कधी मिळेल? या एपिसोडची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Tags: marathi actormarathi serialTharala tar mag
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Pravin Tarde village video

Video : मुळशीमधील गावात शेतीत रमले प्रवीण तरडे, शेत बांधावर लावलं सफरचंदाचं झाड, व्हिडीओ व्हायरल  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.