शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लेक असावी तर अशी! वयाच्या २८व्या वर्षी आईसाठी घेतलं नवं घर, अभिनेत्रीच्या नव्या घराच्या गृहप्रवेशाची झलक समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 30, 2025 | 2:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
 rasika dhamankar new home

लेक असावी तर अशी! वयाच्या २८व्या वर्षी आईसाठी घेतलं नवं घर, अभिनेत्रीच्या नव्या घराच्या गृहप्रवेशाची झलक समोर

 rasika dhamankar new home : आई आपल्या मुलांसाठी अथक प्रयत्न करते. ती नेहमीच आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करते. त्यांच्यासाठी काय योग्य काय वाईट याबाबत तिला सर्वकाही माहित असतं. आई मुलांसाठी खूप काही करते असं आपण अनेकदा ऐकलं आहे पण जेव्हा हीच मुलं वयात आल्यानंतर आपल्या आईसाठी काहीतरी करु पाहतात. अशातच एका मराठमोळ्या कलाकाराच्या मुलीने आईलाच तिच्या वाढदिवसानिमित्त खास भेट दिली आहे. कलाविश्वात कलाकार मंडळी त्यांच्या मुलांबरोबरचे खास क्षण नेहमीच चाहत्यांसह शेअर करतात. आणि या चाहत्यांनाही कलाकारांच्या मुलांबद्दल, कुटुंबाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिलेली असते. अशातच एका आई-मुलीच्या खास बॉन्डबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. अशातच अभिनेत्री रसिका धामणकरच्या लेकीने खास आईसाठी हक्काचं घर भेट दिलं आहे. अभिनेत्रीच्या लेकीने वयाच्या २८ व्या वर्षी स्वमेहनतीवर आईसाठी ही खास भेट दिली आहे. अभिनेत्रीने आणि तिच्या लेकीने या नव्या घराची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. अभिनेत्रीने तिच्या कुटुंबासह नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. या व्हिडीओसह अभिनेत्रीच्या लेकीने खास कॅप्शनही दिलं आहे.

आणखी वाचा – “६,७०,१५१ रुपये अडकलेत”, ‘हे मन बावरे’च्या निर्मात्यावर कलाकारापाठोपाठ दिग्दर्शकाचेही थकबाकीचे आरोप, म्हणाला, “आदर आहे म्हणून…”

View this post on Instagram

A post shared by Antara Vijay (@antara_1612)

रसिका धामणकर यांची लेक अंतरा लिहिते, “आमचं घर माझ्या बाबांची मेहनत, परिश्रम आणि माझ्या आईच्या प्रेमाने एकत्र बांधलं गेलं आहे. लहापणापासून मी एक स्वप्न पाहिलं होतं, ते म्हणजे माझं हक्काचं, स्वतःचं नाव असलेलं सुंदर घर असावं. मुंबई मैं अपना घर… मी स्वतःच्या मनाशी निश्चय केला होता, जेव्हा मी पहिलं घर घेईन ते माझ्या आईचं असेल. ते घर माझ्या आईसाठी असेल, मी तिला गिफ्ट देईन. वयाच्या २८ व्या वर्षी ते स्वप्न खरं झालं. २०२५ या वर्षात माझ्या आयुष्यात अनेक बदल झाले… माझ्या आई-बाबांच्या आशीर्वादामुळे हे सगळं शक्य झालं आहे”.

आणखी वाचा – मालिका सुरु होण्याआधी शिवानी सोनारने दिली गुडन्यूज, आलिशान, महागड्या गाडीसह फोटो केले शेअर, म्हणाली, “माझ्या तारिणीचं…”

पुढे तिने लिहिलं आहे की, “आई के लिए एक नया घर… मेरी मेहनत और सबर का फल.’ आणखी एक सत्य सत्यात उतरलं…हे तुझ्यासाठी आहे आई… आय लव्ह यू आई”. अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे. रसिका यांनी ‘लग्नाची बेडी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण काम केले. याशिवाय त्यांनी ‘अबोली’ या मालिकेत काही दिवसांपूर्वी एंट्री घेतलेली पाहायला मिळाली

Tags: dreammarathi actressmarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Urvashi rautela troll video

जाहिरातीसाठी काहीपण?, श्रावणात चिकन खाणं प्रसिद्ध अभिनेत्रीला पडलं महागात, नेटकरी म्हणाले, "तू शाकाहारी होतीस ना?"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.