‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, सायली व अर्जुन साक्षीदार शिवानी जाधव हिला साक्षीपासून सेफ जागी राहता यावे म्हणून स्वतःच्या घरी यायला सांगतात. त्यावर शिवानीही सायलीवरील विश्वासापोटी त्यांच्या घरी यायला तयार होते. दुसरीकडे साक्षी महीपतला जेलमध्ये भेटते. तेव्हा महीपत साक्षीला अर्जुनच्या तावडीत कोर्टामध्ये आयत्यावेळी अडकू नये म्हणून चैतन्यला थोडं खरं बोलून वेळ मारुन न्यायला सांगतो. (Tharal Tar Mag Serial Update)
दुसरीकडे अस्मिताला तन्वी फोन करून घरातल्या घडामोडीवर नीट लक्ष ठेवायला सांगते. एकीकडे सायली- अर्जुन शिवानी जाधवला आपल्या घरी आणतात. सायलीची आश्रमातली ती मैत्रीण असून तिच्या पेपरसाठी ती इथे आली आहे असं सांगून तिच्या राहण्याबद्दल परवानगी मागतात. पूर्णाआईसुद्धा शिवानीला त्यांच्या घरी राहायची परवानगी देतात. सायली शिवानीला आपल्या खोलीत घेऊन येते आणि निश्चिन्त राहण्याबद्दल विश्वास देते.
तर इथे नागराज व प्रियाला भेटायला शवाघरातली नर्स येते आणि सिनियर डॉक्टर सुट्टीवरुन परतल्याने प्रतिमासाठीची बॉडी न देण्याबद्दल सांगते. शिवाय डॉक्टर कॉन्फर्न्सला दोन दिवसात जाणार असल्याने दोन दिवसांनंतर बॉडी मिळण्याबद्दल प्रिया नागराजला सांगते. त्यावर प्रिया दोन दिवसांनी मात्र बॉडी मिळालीच पाहिजे असं तिला बजावते. तर कोर्टात निघण्याच्या दिवशी अर्जुन-सायली शिवानीसह तयार असतात. शिवानीला कोर्टात हजर करण्यासाठी ते निघणार तेवढ्यात तन्वी घरी येते.
अर्जुन चलाखीने मोठ्याने तन्वीचं नाव घेत सायलीला सावध करतो. सायलीसुद्धा लगेच शिवानीला घेऊन खोलीत जायला निघते. पण शेवटी तन्वीच्या नजरेत शिवानी येतेच. मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, सायली तन्वीला कोर्टात न जाता इथे येण्याबद्दल विचारते तेव्हा ती आश्रमातील मैत्रिणीला भेटायला आल्याचं सांगते. ती मुलगी कोण असं तन्वी विचारते तेव्हा कल्पना श्वेता असं नाव सांगते. पण श्वेता नावाची कुठलीच मुलगी आश्रमात नसल्याचं तन्वी सांगते. आता सायली-अर्जुन सुखरूप शिवानीला घेऊन कोर्टात पोहोचणार का?, हे पाहणं रंजक ठरेल.