‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहायला मिळत आहे की, गोरे बाई कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल अर्जुनच्या केबिनमध्ये शोधत असताना अर्जुन तिथे येतो आणि गोरे बाईंना कितीही अर्जंट काम असलं तरी मी येण्याआधी केबिनमध्ये न येण्याची सक्त ताकीद त्यांना देतो. कुसुम अर्जुनला भेटायला येते आणि सायलीबद्दल खूप महत्वाचं बोलायचं असल्याचं अर्जुनला सांगते. एकीकडे साक्षी अण्णांना भेटायला जेलमध्ये येते. चैतन्यने आश्रम केस जास्तच मनावर घेतली असून त्याबद्दल तो सतत विचारात असल्याच साक्षी अण्णांना सांगते. तुम्ही जेलमध्ये असल्याने एकटी पडल्याचंही त्यांना सांगते. (Tharal Tar Mag Serial Update)
चैतन्य व अर्जुन पुन्हा एकत्र येऊ शकतात अशी शंका साक्षी अण्णांकडे व्यक्त करते. दुसरीकडे कुसुम अर्जुनला प्रश्न विचारते की, कॉन्ट्रॅक्टच्या नियमात काही बदल झाला आहे किंवा केला आहे का आणि तुम्ही ते नियम पाळताय ना? त्यापुढे कुसुम कॉन्ट्रॅक्टचे शेवटचे दिवस असून हे कॉन्ट्रॅक्ट सायलीला आयुष्यभर महागात पडणार नाही, असं तुम्ही वागाल हे वचन अर्जुनकडे मागते. सायलीला आपल्या वागण्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असं अर्जुनसुद्धा कुसुमला वचन देतो. दुसरीकडे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधताना अर्जुन तिथे पोहोचल्याने फाईल न मिळाल्याबद्दल गोरे बाई तन्वीला सांगतात.
घरी आल्यावर सायलीच्या सुजलेल्या डोळ्यांकडे पाहून अर्जुन सायलीला तुम्ही रडत होता का?, असं विचारतो. खूप दिवसांनी कुसुम घरी आल्याने मधुभाऊंचा विषय निघाल्याने रडू आलं असेल असं कल्पना अर्जुनला सांगते. सायली खोलीत स्वतःच अंथरून जमिनीवर घालते. त्यावर अर्जुन तिला असं का करत असल्याचं विचारतो. पण कॉन्ट्रॅक्ट संपत आलं असल्याने आता असंच करावं लागणार असल्याचं सायली अर्जुनला सांगते. अर्जुन मनोमन हे सगळं अंतर नको असल्याचा विचार करतो. सायली सुद्धा हे वागणं खूप अवघड जात असलं तरी याला पर्याय नाही असा मनात विचार करते.
मालिकेच्या पुढील भागात असे पाहणार आहोत की, कॅलेंडरनुसार कॉन्ट्रॅक्ट संपायला फक्त दोनच दिवस शिल्लक असल्याची जाणीव सायली अर्जुनला करुन देते. तेवढ्यात अर्जुनला ठेच लागते आणि अर्जुनला सायली मलम लावते. मलम लावताना आत्ता मी असल्याने मलम लावतेय पण मी गेल्यावर काय?, असा प्रश्न सायली अर्जुनला करते.