‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात आज आपण पाहणार आहोत, अर्जुन सायलीच्या मनात नेमकं काय चालू आहे हे ओळखायला हवं म्हणून तो मुद्दाम डबा तिथेच विसरून जातो आणि सांगतो की, नक्कीच सायली माझ्यासाठी टिफिन घेऊन ऑफिसला येतील तेव्हा मी त्यांच्याशी बोलेन असं म्हणून तो कोणालाही न सांगता ऑफिसला निघून जातो. त्यानंतर कल्पनाच्या लक्षात येत की अर्जुन डब्बा घरीच विसरून गेला आहे. तेव्हा कल्पना सायलीला सांगते की तू अर्जुनचा टिफिन घेऊन ऑफिसला जा. हे ऐकल्यावर सायली आधी सांगते की, तुम्ही आज टिफिन घेऊन जाता का त्यांना सरप्राइज मिळेल. यावर कल्पना नाही सांगते आणि सायलीला जबरदस्ती टिफिन घेऊन पाठवते. (Tharal Tar Mag Serial Update)
त्यानंतर इकडे सायली टिफिन घेऊन जाताना विचार करत असते की, हा टिफिन घेऊन गेले तर त्यांना माझी सवय होईल, आणि नाही घेऊन गेले तर त्यांना धडा मिळेल की उद्यापासून ते टिफिन विसरून जाणार नाहीत. असं म्हणून ती माघारी जात असताना सायलीच्या मनात विचार येतो की, नाही घेऊन गेले तर ते उपाशी राहतील आणि काहीच खाणारही नाही किंवा बाहेरचं खातील हा विचार करून ती तिथून निघून जाते. तर इकडे अर्जुन सायली अजून टिफिन घेऊन आली कशी नाही, तेव्हा तो कल्पनाला फोन करतो तेव्हा कल्पना मस्करी करत म्हणते सायली घराबाहेर पडली आहे पण टिफिन घेऊन नाही गेली. काही न सांगता सायली कुठे गेली, ती घर सोडून तर गेली नसेल ना हा विचार करत अर्जुनला आणखीनच टेन्शन येतं.
त्यानंतर इकडे चैतन्य अर्जुनला भेटण्यासाठी धडपडत असतो कारण त्याला महिपतकडे फोन असल्याचं सत्य अर्जुनला सांगायचं असतं. यानंतर इकडे सायली ऑफिसला येते तेव्हा अर्जुन म्हणतो की, तुम्ही माझा फोन का उचलत नव्हता आणि तुम्ही घराबाहेर पडला तर कोणाला काही सांगितलं का नाही यावर सायली काहीच बोलत नाही आणि जेवायला सांगते. सायलीही जेवलेली नसते म्हणून दोघेही जेवायला बसतात. त्यानंतर अर्जुन कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल काढतो आणि म्हणतो ही आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल. यावर सायली आठवण करून देते की, ठरल्याप्रमाणे आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. तुम्ही काय करायचं याचा विचार केला आहे का?.
तितक्यात तिथे चैतन्य येतो आणि म्हणतो की, महिपत बाबत मला एक बातमी समजली आहे. महिपतकडे जेलमध्ये फोन आहे आणि तो काहीतरी मधुभाऊंबद्दल बोलत होता. आता मधु भाऊंसाठी सायली व अर्जुन आणखी काही दिवस कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाढवून घेणार का?, अर्जुन सायलीला थांबवणार का?, मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरेल.