सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लेकाला शाळेतच न पाठवणारी आई, १३ वर्षांचा मुलगा शाळेत न जाता कसं घेतो शिक्षण?, थक्क करणारा संपूर्ण प्रवास

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 23, 2024 | 7:12 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Amruta Joshi Amdekar know about her see the details

लेकाला शाळेतच न पाठवणारी आई, १३ वर्षांचा मुलगा शाळेत न जाता कसं घेतो शिक्षण?, थक्क करणारा संपूर्ण प्रवास

शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्रत्येकानेच घेतलं पाहिजे असं म्हटलं जातं. आजच्या या स्पर्धात्मक युगात आपला मुलगा-मुलगी कायमच सर्वांपेक्षा पुढे असावेत, ते कायमच सर्व क्षेत्रात अग्रेसर असावेत असा प्रत्येक आई-वडिलांचा अट्टहास असतो आणि त्यामुळे प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी मेहनत घेताना दिसतात. मात्र आज आम्ही अशा एका आईची गोष्ट जाणून घेणार आहोत, जिने आपल्या मुलाला शाळेतच पाठवलं नाही. ही आई स्वतः उच्चशिक्षित आहे, मात्र आपल्या लेकराला तिने आजवर शाळेत पाठवलच नाही आणि ही आई म्हणजे अमृता जोशी आमडेकर.

‘मज्जा पिंक’ला दिलेल्या खास मुलाखतीत अमृता यांनी त्यांच्या व त्यांच्या मुलाच्या या अद्भुत प्रवासाबद्दल सांगितले आहे. या प्रवासात त्यांना अनेक टीका व टोमणे सहन करावे लागले. पण लोकांच्या या टीका-टोमण्यांना न जुमानता आज त्या आपल्या मुलाला अगदी उत्तम शिक्षण देत आहेत. यावेळी अमृता यांनी असं म्हटलं की, “त्याने एक-दोन वर्षे शाळा अनुभवली आहे. आधी तो इंटरनॅशनल शाळेत होता व नंतर त्याने आय.सी.एस.सी. बोर्डाची शाळा अनुभवली आहे. यादरम्यान त्याला आम्ही Homeschooling करत होतो. मात्र एके दिवशी त्याने येऊन सांगितलं की, त्या शाळेपेक्षा आपली Homeschooling जास्त आवडते.”

आणखी वाचा – आई झाल्यानंतर कार्तिकी गायकवाडची पहिली पोस्ट, आनंद गगनात मावेना, कलाकारांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव

यापुढे अमृता यांनी असं म्हटलं की, “लग्नाच्या आधी मी माझे शिक्षण घेत असताना एके ठिकाणी वाचलं होतं की, अमेरिकेत एका आई-वडिलांनी त्यांच्या मुलाला शाळेत न् पाठवताच Homeschooling द्वारे शिक्षण दिले. त्यामुळे मीही माझ्या मुलाला शाळेत न पाठवता माझ्या मुलाला Homeschooling चं शिक्षण देणार असं ठरवलं होतं. मात्र लग्नानंतर मी जे ठरवलं होतं ते सगळं विसरून गेले आणि मीसुद्धा त्याला शिक्षण देण्याच्या शर्यतीत लागले. पण या सगळ्यात शिक्षण मिळत नव्हतं असं मला वाटलं आणि मग त्याला Homeschooling देण्याचा माझा प्रवास सुरु झाला”.

आणखी वाचा – नेत्राने कोंडून ठेवल्यानंतर नागाने येऊन रुपालीची केली सुटका, विरोचकाची शक्ती आणखी वाढणार, देवीआई मदत करणार का?

यापुढे अमृता यांनी Homeschooling ची संकल्पना समजावून सांगताना असं म्हटलं की, “Homeschooling म्हणजे सानुकूलित शिक्षण (customized education). आज आपल्याला सगळ्या गोष्टी customized म्हणजेच आपल्या सोयीनुसार मिळत आहेत, त्याच पद्धतीने शिक्षणदेखील मिळाले पाहिजे असं मला वाटतं आणि त्याच उद्देशाने ही Homeschooling ची पद्धत सुरु झाली. पण मग शिक्षण व्यवस्थेचा भाग होण्यासाठी दहावी, बारावीची परीक्षादेखील देता येते. यासाठी अनेक पर्याय आहेत. Homeschooling मध्ये इतर शिक्षणासह या शिक्षणपद्धतीचा अभ्यासही चालूच असतो.”

Tags: Amruta Joshi AmdekarAmruta Joshi Amdekar Marathi NewsMarathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Paaru Serial Update

प्रीतम प्रेमात पडला अन्…; पारूसमोर व्यक्त केल्या भावना, हरीशबरोबरच्या नात्यासाठी आदित्यचे प्रयत्न सुरु

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.