‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळत आहे की, सुभेदार कुटुंब सायली व अर्जुनला त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज देतात आणि केक कट करायला सांगतात आणि त्यानंतर लग्नातला त्यांचा एक व्हिडीओ ते स्क्रीनवर प्ले करतात यावर अर्जुन विचारतो की, हा व्हिडीओ तुम्हाला कसा मिळाला?, त्यावर अर्जुनचा भाऊ आम्हाला चैतन्यने या व्हिडीओसाठी मदत केली असल्याचे सांगतो. हे ऐकल्यावर अर्जुन आणि सायलीला धक्काच बसतो. (Tharal Tar Mag Serial Update)
तर दोघेही विचार करतात की आता हे यांच्यासमोर आपण सगळं सत्य कसं लपवून ठेवायचं. त्यानंतर अर्जुन चैतन्यला सोडायला जातो तेव्हा तिथे ते दोघे बोलत असतात. तेव्हा चैतन्यला अर्जुन म्हणतो की, हे सगळं कठीण होऊन बसलं आहे आणि उद्या सायली घर सोडून जाणार असल्याचंही तो सांगतो. यावर चैतन्य अर्जुनला तिला हक्काने थांबायला सांग असं सुचवतो. त्यानंतर चैतन्यला उशीर होतो म्हणून तो निघून जातो. त्यावर साक्षीला संशय येतो की, चैतन्य अर्जुनला तर भेटायला गेला नसेल, मात्र चैतन्य चलाखीने सांगतो की, मी अर्जुनला नाहीतर पंकजला भेटायला गेलो होतो. पंकज आणि पूजाच भांडण झालंय म्हणूनच मी गेलो होतो. मात्र साक्षीला खात्री पटावी म्हणून तो म्हणतो असंच असेल तर तू उद्या माझ्याबरोबर पंकजला भेटायला चल. तसेच तू पूजालाही भेट म्हणजे तू त्यांना नाती कशी जपावीत हे समजावून सांगशील.
यावर साक्षी विश्वास ठेवते की, हा नक्की पंकजलाच भेटायला गेला असेल. त्यानंतर घरी सुभेदार कुटुंबात कल्पना प्रताप सगळेजण खूप खुश असतात आणि सायली व अर्जुनच औक्षणदेखील करतात आणि दोघांनाही आशीर्वाद देतात मात्र त्यानंतर अर्जुन ऑफिसला जायला निघतो आणि सांगतो की, आमची अनिवर्सरी आहे म्हणून कोर्ट बंद नाही ना. मला जावंच लागेल असं म्हणून तो ऑफिसला निघून जातो. तर सायली इकडे स्वयंपाक घरात आठवणीत रमलेली असते तर अर्जुन तिकडे सायलीच्या काळजीत असतो. दोघांनाही कळत नाही की आता काय होणार.
मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, सायलीने एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते आणि त्यात निरोप घेतलेला असतो. आता सायली खरंच घर सोडून गेली आहे का?, हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.