‘ठरलं तर मग’ मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिका जेव्हापासून सुरु झाली तेव्हापासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळत आहे. या मालिकेने, मालिकेच्या कथानकाने, मालिकेतील पात्रांनी ही प्रेक्षकांना अक्षरशः खुर्चीत खिळवून ठेवलं आहे. या मालिकेचं कथानक सध्या सायली व अर्जुन यांच्याभोवती फिरताना दिसत आहे. (Tharal Tar Mag Serial Promo)
मालिकेत सध्या सायली व अर्जुन यांचा रोमँटिक अंदाज सुरु असताना मालिकेत टर्निंग पॉईंट आलेला पाहायला मिळाला. मालिकेत सायली व अर्जुन यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये आल्याने दोघांच्या नात्यात दुरावा आला असल्याचं पाहायला मिळत आहे. सायली व अर्जुन यांच्या फुलणाऱ्या प्रेमात कॉन्ट्रॅक्ट मॅरेजने उडी घेत ही त्यांच्यात दुरावा आणला आहे. सायली व अर्जुनने मधुभाऊंची केसमधून सुटका करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं असतं. आणि आता या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे शेवटचे ४८ तास शिल्लक राहिलेले असतात.
सायली व अर्जुन पुढे काय असं म्हणत सहमताने एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. तर त्यांच्या लग्नाला वर्ष पूर्ण होणार म्हणून कल्पना घरातल्यांच्या मदतीने दोघांना सरप्राइज देण्याचं ठरविते. त्यानुसार सायली व अर्जुन यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला सुभेदार कुटुंब त्यांना सरप्राइज देतात. या सरप्राइजचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे.
प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, सगळ्यांनी सायली-अर्जुनच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला जय्यत तयारी केलेली असते. ते पाहून दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर दोघेही केक कापायला जातात, तेव्हा त्यांना एकमेकांसाठी इच्छा मागायला लावतात. यावेळी सायली मनातल्या मनात इच्छा मागते की, या घराला आणि घरातल्या माणसांपासून दूर गेल्यानंतर मला यांना विसरायची ताकद दे. तर अर्जुन म्हणतो, मला सायलीपासून कधीच दूर जायचं नाही. मला त्या माझ्या आयुष्यात हव्या आहेत”.आता लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सायली व अर्जुन प्रेमाची कबुली देणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.