‘ठरलं तर मग’ मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत. ‘स्टार प्रवाह’वर ही मालिका जेव्हापासून सुरु झाली तेव्हापासून या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. मालिकेच्या कथानकाने, मालिकेतील कलाकारांनी या मालिकेला एका उंचीवर नेलं आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळते. मालिकेत अर्जुन व सायलीच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. मालिकेत अर्जुन ही भूमिका अभिनेता अमित भानुशाली साकारताना दिसत आहे. अर्जुन या भूमिकेमुळे अभिनेत्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. (Amit Bhanushali and Son)
सोशल मीडियावरही अमित बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अमित त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतचे ही अपडेट नेहमीच शेअर करताना दिसतो. अमितला हृदान नावाचा मुलगा आहे. त्याचं आणि हृदानचं सुंदर बॉण्डिंग नेहमीच त्यांच्या चाहत्यांना भारावून टाकतं. अशातच, अमितची लेकाबरोबरची एक पोस्ट समोर आली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘फादर्स डे’निमित्त अमितच्या लेकाने त्याला एक खास सरप्राइज दिलं आहे. याचा सुंदर असा फोटो अमितने शेअर केला आहे. अमितने शेअर केलेल्या या फोटोत हृदानने त्याच्या आजीच्या मदतीने बाबासाठी खास केक आणला आहे. त्यानंतर हृदानसह अमितने तो केक कट करत फादर्स डे साजरा केला आहे. लेकाबरोबरचे खास फोटो त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत. अर्जुन नेहमीच त्याच्या लेकाचे अनेक धमाल-मस्ती करतानाचे व्हिडीओ शेअर करत असतो.
मालिकेत सध्या अर्जुनवर खूप मोठं संकट आलेलं पाहायला मिळत आहे. साक्षीने बाजी पलटल्याने अर्जुन व चैतन्य अडचणीत अडकले आहेत. मालिकेत आलेल्या या ट्विस्टनंतर आता ही मालिका रंजक वळणावर आली आहे. अर्जुनवर ओढवलेल्या या संकटातून सायली त्याची सुखरूप सुटका करणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.