सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट उलगडणार ‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटातून, श्रमेश बेटकर दिसणार मुख्य भूमिकेत

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 25, 2025 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Last Stop Khanda New Movie

प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट उलगडणार 'लास्ट स्टॉप खांदा' चित्रपटातून, श्रमेश बेटकर दिसणार मुख्य भूमिकेत

Last Stop Khanda New Movie : आयुष्याचा प्रवास सुरु झाला की प्रत्येकाला प्रेमाच्या स्टॉपवर थांबावंसं वाटतंच. या प्रवासात या स्टॉपवर काहीजण थांबतात, काहीजण रमतात, काहीजण भेटतात, काहीजण हा प्रवास अर्ध्यावरच सोडतात, असा प्रवास पुढे चालू राहतो पण त्या स्टॉपवरचं रेंगाळण मनात साठून राहतंच. अशीच प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट असलेला ‘लास्ट स्टॉप खांदा’ हा संगीतमय चित्रपट २१ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘शिवम फिल्म क्रिएशन सिग्नेचर ट्यून्स’, ‘स्नेहा प्रॉडक्शन्स’ यांनी ‘लास्ट स्टॉप खांदा’ प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

सचिन कदम आणि सचिन जाधव यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. प्रदिप मनोहर जाधव हे या चित्रपटाचे निर्माते असून सचिन कदम, अमृता सचिन जाधव सहनिर्माते आहेत. श्रमेश बेटकर लिखित या चित्रपटाचं दिग्दर्शन विनीत परुळेकर यांनी केलं आहे. या नव्या रोमँटिक चित्रपटात अभिनेता श्रमेश बेटकर अभिनेत्री जुईली टेमकर, निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश करपेकर, प्रियांका हांडे, डॉ. सचिन वामनराव, गणेश गुरव, निशांत जाधव, गिरीश तेंडुलकर, जयश्री गोविंद अशी तगडी स्टारकास्ट आहे.

आणखी वाचा – परिणीती चोप्रा व राघव चड्ढा आई-बाबा होणार, लग्नाच्या दोन वर्षानंतर गुडन्यूज, शेअर केली खास पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून प्रभाकर मोरे, धनश्री काडगावकर, अशोक ढगे हे कलाकार आपल्या भेटीस येणार आहेत. चित्रपटाचे छायांकन हरेश सावंत यांचे असून कलादिग्दर्शक म्हणून केशव ठाकुर यांनी जबाबदारी सांभाळली आहे. श्रेयस राज आंगणे, श्रमेश बेटकर लिखित गीतांना श्रेयस राज आंगणे आणि किशोर मोहिते यांचे संगीत लाभले आहे. प्रेमाच्या नात्याचा वेध आजवर अनेक चित्रपटांमधून घेतला गेला आहे. तरीही प्रेम या संकल्पनेच्या नवनव्या गोष्टी चित्रपटांतून मांडल्या जातात.

आणखी वाचा – संकर्षण कऱ्हाडेच्या ‘तू म्हणशील तसं’ नाटकाचा शेवट, निरोप घेताच अभिनेता भावुक, म्हणाला, “तुमच्या मनांत…”

‘लास्ट स्टॉप खांदा’ प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटातूनही अशीच एक नावीन्यपूर्ण कहाणी मांडण्यात आली आहे. या गोष्टीला श्रवणीय संगीताचीही साथ आहे. चित्रपटातून एक तरुण आणि त्याच्या प्रेमाची गोष्ट उलगडणार असून प्रत्येकाला रीलेट होईल अशीच ही गोष्ट आहे. नव्या दमाचे कलाकार, उत्तम कथा, तांत्रिकदृष्ट्या सकस असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच वेगळा अनुभव देणार आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचं मनोरंजन करणारा हा चित्रपट पाहण्यासाठी आता २१ नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Tags: entertainmentLast Stop Khandamarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Ganeshotsav Special Media

प्रथमेश लघाटेचं कुटुंब बाप्पाच्या सेवेत मग्न, मुग्धाही गणेशाची मूर्ती रंगवण्यात व्यस्त, व्हिडीओ पाहताच संस्कारांचं कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.