रविवार, जून 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रुचिता-दिपाली एकमेकींना भिडल्या, ‘बिग बॉस’च्या घरात तुफान राडा, कानाखाली मारली अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 4, 2026 | 12:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 6

रुचिता-दिपाली एकमेकींना भिडल्या, 'बिग बॉस'च्या घरात तुफान राडा

Bigg Boss Marathi 6 : ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी ६’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. घरात रोज काही ना काही कारणावरून वादविवाद पाहायला मिळत आहे. आता समोर आलेल्या नव्या प्रोमोमुळे पुन्हा एकदा वातावरण तापल्याचं दिसत आहे. टास्कदरम्यान झालेल्या गोंधळामुळे घरातील तणाव अधिक वाढला असून, रुचिता जामदार, राकेश बापट आणि दिपाली सय्यद यांच्याभोवती हा वाद फिरताना दिसतो. ‘कलर्स मराठी’ने नुकताच ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६चा नवा प्रोमो शेअर केला आहे. त्यामध्ये रुचिता जामदार आणि दिपाली सय्यद यांच्यात जोरदार वाद झालं आहे.

समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिपाली सय्यदने केलेल्या एका चुकीच्या विधानामुळे रुचिता प्रचंड दुखावलेली दिसते. त्यामुळे ती दिपालीशी बोलण्यासाठी तिच्याजवळ जाते. याचवेळी घरातील इतर सदस्यही तिथे जमलेले दिसतात. रुचिता सर्वांसमोर आरोप करते की, “दिपालीने घरात सगळ्यांना सांगितलं आहे की रुचिताने राकेश बापटला टच केलं आहे,” असं चुकीचं विधान तिच्या नावाने पसरवलं गेलं आहे. या आरोपावर दिपाली सय्यद पूर्णपणे शॉक होते आणि म्हणते, “रुचिता, मी तसं काहीही बोललेली नाही. मी नव्हतेच तिथे,” असं स्पष्टीकरण देते. मात्र वाद थांबण्याऐवजी अधिकच चिघळतो. यावर रुचिता, “अंगावर चढू नकोस,” असं दिपालीला सुनावते. त्यावर दिपालीही शांत न बसता, “जास्त बोलू नकोस, नाहीतर कानाखाली देईन,” असं म्हणते. (Bigg Boss Marathi 6)

आणखी वाचा – कॅप्टन्सी टास्कदरम्यान रुचिता-करणची मारामारी, ‘बिग बॉस’च्या घरात करणचा राग अनावर, रुचिताच्या अंगावर धावून गेला अन्…

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

दिपालीच्या या वक्तव्यानंतर रुचिता अधिक संतापते आणि “हा, मारून दाखव,” असं म्हणत आपला राग व्यक्त करते. या संपूर्ण वादामुळे घरातील वातावरण प्रचंड तणावपूर्ण झाल्याचं दिसत आहे. आता या वादाचं पुढे काय होणार? रुचिता आणि दिपाली सय्यद यांच्यात मारामारी होणार का? की हा वाद इथेच थांबणार? दिपालीने खरंच हात उचलला का?, हे पाहून मनोरंजक ठरणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात निर्माण झालेलं हे नवं वादळ पुढे कोणतं वळण घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सध्या हा नवा प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत आहे. (Bigg Boss Marathi 6)

आणखी वाचा – अपूर्वाच्या आयुष्यातील ‘मिस्ट्री मॅन’ समोर, अभिनेत्याच्या प्रेमात आहे अभिनेत्री, बालकलाकार म्हणून भूमिका गाजलीय

Tags: Bigg Boss Marathi 6Dipali SayyedentertainmentRuchita Jamdar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Apurva Gore wedding

'आई कुठे…' फेम अभिनेत्रीने दिली प्रेमाची जाहीर कबुली, दोघांच्या कुटुंबाबरोबरचे फोटो केले शेअर, म्हणाली, "जोश्यांची सून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.