‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ही मालिका खूप लोकप्रिय आहे. गेली अनेक वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेमधील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस पडल्या आहेत. आतापर्यंत अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली आहे. टप्पू सेना ही ही चाहत्यांच्या अधिक पसंतीस पडली आहे. सुरुवातीला या मालिकेतील टप्पूची भूमिका करणारा कलाकार भव्या गांधी हा मालिकेतून बाहेर पडला. त्यानंतर सोनू ही भूमिका साकारणारी झील मेहतादेखील या कार्यक्रमातून बाहेर पडली. आता अजून एका कलाकाराने मालिकेला राम राम केला आहे. (kush shah leave show)
अभिनेता कुश शाह या मालिकेमध्ये गोलीची भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आहे. मात्र आता तो या शोमधून बाहेर पडणार अशा चर्चा सुरु आहेत. या आफवा असतानाच गोलीच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.
या फोटोमध्ये कुश न्यूयॉर्कमधील एका बीचवर वेळ घालवताना दिसत आहे. यावेळी त्याने शिक्षण पूर्ण करण्यासाठी मालिका सोडली असल्याचा खुलासा चाहत्याने केला आहे. ही पोस्ट रेडिटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, “स्टॅच्यु ऑफ लिबर्टीच्या इथे जाताना न्यूयॉर्कमध्ये अचानक कुश भेटला. शिक्षण पूर्ण करण्यासाठी मालिका सोडली असल्याचे त्याने मला सांगितले”.
ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच गोलीच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका फॅनने लिहिले आहे की, “नाही. मी गोली व जेठालालची मस्ती खूप एंजॉय करत होतो. पण त्याच्यासाठी हे सगळं चांगलं आहे”, अजून एकाने प्रतिक्रिया दिली आहे की, “आता इतकी मजा येणार नाही”. कुशचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान कुशने मालिका सोडल्याची अधिकृत घोषणा केली नाही. मात्र कुशच्या भूमिकेने सगळ्यांचे मनोरंजन झाले होते. त्याचा एक वेगळा चाहतावर्गदेखील आहे.