सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“रंगामुळे अनेकांकडून ऐकून घ्यावं लागलं…”, जुळ्या मुलींच्या रंगांवरुन सुप्रसिद्ध अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “कुटुंबातील सदस्यच…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 27, 2025 | 3:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Rubina Dilaik daughters

"रंगामुळे अनेकांकडून ऐकून घ्यावं लागलं…", जुळ्या मुलींच्या रंगांवरुन सुप्रसिद्ध अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, "कुटुंबातील सदस्यच…"

Rubina Dilaik daughters : अभिनेत्री रुबिना दिलैकने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आई झाल्याची गुडन्यूज शेअर केली होती. रुबिना दिलैकने जुळ्या मुलींना जन्म दिला. रुबिना व अभिनव यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये जुळ्या मुलींना जन्म देत आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. आई-बाबा झाल्यानंतर ही जोडी विशेष चर्चेत असलेली दिसली. सोशल मीडियावर मात्र त्यांनी त्यांच्या लेकींचे चेहरे काही दाखवले नव्हते. आता तब्बल ११ महिन्यांनंतर दोघांनीही आपल्या छोट्या देवदूतांचा चेहरा जगाला दाखवला आहे. रुबिना व अभिनव यांच्या लेकी एधा व जीवा यांनी आपल्या निरागसतेने सर्वांची मने जिंकली आहेत.

खरंतर, रुबिना दिलैक तिच्या कामाबरोबरच युट्युबवर व्हिडीओ बनविण्यात सक्रिय असते. सोशल मीडियावरही ती नेहमीच सक्रिय असलेली पाहायला मिळाली आहे. त्यावर अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अपडेट्स चाहत्यांबरोबर शेअर करते. तिच्या नवीनतम ब्लॉगमध्ये रुबिना तिच्या मुली एधा आणि जीवाबद्दल बोलताना दिसली. अभिनेत्री म्हणाली, “माझ्या मुली फक्त दीड वर्षाच्या आहेत; पण मला त्यांच्या रंगामुळे अनेकांकडून ऐकून घ्यावं लागलं आहे. कारण माझी एक मुलगी थोडी गोरी आहे आणि दुसरी थोडी सावळी आहे. अशा परिस्थितीत जो कोणी त्यांना पाहतो, तो त्यांची तुलना करु लागतो”.

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ संपणार?, मालिकेच्या कथानकाबद्दल अर्जुन सुभेदार व्यक्त, म्हणाला, “ही कोर्ट केस संपली की…”

रुबिना पुढे म्हणाली, “माझ्या घरात या गोष्टी मला सहन होत नाहीत. फक्त बाहेरचेच नाही, तर कधी कधी माझ्या कुटुंबातील सदस्यही मला याबद्दल सल्ला देऊ लागतात. ते म्हणतात की, तू तिला मसूरची पेस्ट किंवा उटन का लावत नाहीस. त्यामुळे तिचा रंगही गोरा होईल. मी त्यांना लगेच उत्तर देते की, मी हे करणार नाही. मी माझ्या मुलींना नेहमीच सांगते की, तुम्ही सुंदर आहात, निर्भय आहात”.

आणखी वाचा – शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर स्वतःला सावरणं पतीला झालंय कठीण, अभिनेत्रीने केलेल्या पूजेचा पाटही उचलला नाही; भावुक पोस्ट

रुबिना व अभिनवने जून २०१८ मध्ये शिमला येथे लग्न केले. यानंतर, सप्टेंबर २०२३ मध्ये तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या गरोदरपणाची घोषणा केली. रुबिना तिच्या निर्दोष शैलीसाठी ओळखली जाते. ती ‘बिग बॉस’ २०१४ ची विजेतीही होती. रुबिनाने आज इंडस्ट्रीमध्ये १६ वर्षांहून अधिक काळ घालवला आहे.

Tags: rubina dilaikRubina Dilaik Abhinav Shuklatelevision actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Rutuja Bagwe New Business

ऋतुजा बागवेचे व्यवसाय क्षेत्रात पदार्पण, 'या' ठिकाणी सुरु केलं स्वतःच हॉटेल, नावंही आहे खूप खास

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.