सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ऋतुजा बागवेचे व्यवसाय क्षेत्रात पदार्पण, ‘या’ ठिकाणी सुरु केलं स्वतःच हॉटेल, नावंही आहे खूप खास

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 28, 2025 | 11:07 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rutuja Bagwe New Business

ऋतुजा बागवेचे व्यवसाय क्षेत्रात पदार्पण, 'या' ठिकाणी सुरु केलं स्वतःच हॉटेल, नावंही आहे खूप खास

Rutuja Bagwe New Business : कलाकार मंडळी अभिनयाबरोबरच व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असलेले पाहायला मिळतात. प्रत्येक कलाकाराचा अभिनयाबरोबरच जोडधंदा हा असावाच. बरेचदा या कलाकारांच्या हाती काहीच काम नसतं तेव्हा यांना हा जोडधंदाच तारतो असं म्हणणं वावगं ठरणार नाही. मराठी कलाविश्वात असे अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांनी व्यवसाय क्षेत्रात आपला जम बसवला आहे. अनेक अभिनेत्रीही बिझनेसवुमन होत एक नवं पाऊल उचलताना दिसल्या. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीने व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे हिंदी, मराठी मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली ऋतुजा बागवे.

ऋतूजा बागवेने हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं आहे. तिने स्वतःच नवं हॉटेल मुंबई येथील मरोळ भागात सुरु केलं आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी अभिनेत्रीने ठाण्यात स्वतःच घर घेतलं. त्यांनतर लगेचच अभिनेत्रीने नवं हॉटेल घेतलं. फूडचं पाऊल असं या तिच्या नव्या हॉटेलचं नाव आहे. हटके नाव देत तिने हे नवीन हॉटेल सुरु केलं आहे. ऋतुजाच्या हॉटेलचा काल उदघाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याला अभिनेता सुबोध भावेने हजेरी लावलेली दिसली. त्यांच्या हस्ते हा उदघाटन सोहळा पार पडला.

आणखी वाचा – “रंगामुळे अनेकांकडून ऐकून घ्यावं लागलं…”, जुळ्या मुलींच्या रंगांवरुन सुप्रसिद्ध अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “कुटुंबातील सदस्यच…”

View this post on Instagram

A post shared by Rutuja Bagwe (@rutuja_bagwe)

ऋतुजाने नुकतीच “आयुष्यात पुढचं पाऊल टाकतेय” अशी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. यावरुनच अभिनेत्रीने तिच्या नव्या रेस्टॉरंटचं नाव ठेवलं आहे. तिच्या नव्या हॉटेलचं नाव आहे ‘फूडचं पाऊल’. याठिकाणी खवय्यांना व्हेज व नॉन व्हेज अशा दोन्ही पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. ऋतुजाने तिच्या नव्या रेस्टॉरंटची पहिली झलक चाहत्यांना व्हिडीओच्या माध्यमातून दाखवली आहे.

आणखी वाचा – “जावईबापू…”, निमिष कुलकर्णीचा साखरपुडा होताच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांच्या कमेंट्स, शिवाली परबच्या कमेंटची चर्चा

अभिनेत्रीने दिलेल्या या आनंदाच्या बातमीवर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. आणि तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हार्दिक जोशी, सोनाली खरे, अश्विनी महांगडे, शर्मिला शिंदे, हर्षदा खानविलकर, प्राजक्ता गायकवाड, पूर्वा कौशिक, माधुरी पवार, केतकी विलास अशा अनेक कलाकारांनी अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव करत दिल्या नव्या व्यवसायासाठी भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: entertainmentmarathi actressrutuja bagwe
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Aamir Khan latest news

आमिर खानच्या घराबाहेर पोलिसांच्या गाड्यांच्या रांगा; २५ आयपीएस अधिकारीही पोहोचले घरी, नेमकं कारण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.