गुरूवार, जून 12, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : दीपिका कक्करला रुग्णालयाच्या बेडवर पाहून हळहळला दोन वर्षाचा लेक, हात सुजलेला दाखवला अन्…; भावुक क्षण समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 10, 2025 | 6:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Dipika Kakar in hospital

Video : दीपिका कक्करला रुग्णालयाच्या बेडवर पाहून हळहळला दोन वर्षाचा लेक, हात सुजलेला दाखवला अन्...; भावुक क्षण समोर

सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत आहे. सुरुवातीला अगदी पोटदुखीचा त्रास सुरु झाल्यानंतर तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला. मात्र त्रास आणखीनच वाढत गेला. परिणामी विविध तपासणीनंतर दीपिकाला लिव्हरचा कॅन्सर असल्याचं समोर आलं. तिच्या लिव्हरमध्ये टेनिस बॉल आकाराचा ट्युमर होता. काही दिवसांपूर्वीच तिची सर्जरी करण्यात आली. दोन ते तीन दिवस आयसीयुमध्ये ठेवल्यानंतर दीपिकाला बाहेर आणण्यात आलं आहे. अजूनही ती रुग्णालयातच आहे. यादरम्यानच्या व्हिडीओ तिचा पती शोएब इब्राहिमने शेअर केला आहे. यामध्ये त्याने सर्जरीनंतर पहिल्यांदाच दीपिकाचा चेहराही दाखवला आहे. (Dipika Kakar in hospital)

दीपिकाला याआधीही सर्जरीसाठी नेण्यात आलं होतं. मात्र सर्जरीला जाण्यापूर्वीच तिची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे डॉक्टरांनी सर्जरीची नवी तारीख दिली. सर्जरीमध्ये दीपिकाचा लिव्हरमधील ट्युमर काढण्यात आला. त्याचबरोबरीने तिचा लिव्हरचाही काही भाग कापण्यात आला आहे. शोएबनेच याबाबत माहिती दिली होती. तब्बल १४ तास दीपिकाची ही सर्जरी सुरु होती. मात्र आता तिची तब्येत ठिक आहे.

आणखी वाचा – “तोच पती सात जन्म मिळतो हे पटतं तुला?”, वटपौर्णिमा साजरी करण्यावरुन अंकितावर भडकली चाहती, दिलं सडेतोड उत्तर

दीपिकाला भेटण्यासाठी तिचा दोन वर्षाचा लेक रुहानही रुग्णालयात आला होता. आईला पाहून तोही खूश झाला. पण दीपिकाला पाहिल्यानंतर त्याने लगेचच तिच्याकडे एक तक्रार केली. त्याने त्याचा हात दीपिकाला दाखवला. रुहानच्या हाताला सूज होती. ती सूज पाहून दीपिकाही काही क्षणांसाठी घाबरली. मात्र त्यानंतर तिने त्याला जवळ घेतलं. रुहानच्या हातावर प्रेमाने हात फिरवला. माय-लेकाचा हा क्षण सगळ्यांच्याच डोळ्यांमध्ये पाणी आणणारा होता.

आणखी वाचा – पारंपरिक लूक, मराठमोळा साज अन्…; रेश्मा शिंदेची पहिली वटपौर्णिमा, साऊथ इंडियन पतीसह घेतले सात फेरे

रुग्णालयामधील व्लॉग शोएब त्याच्या युट्युब चॅनलद्वारे शेअर केला. यामध्ये दीपिका-शोएबचं कुटुंब काळजी घेताना दिसत आहे. तसेच व्हिडीओमध्ये दीपिकाच्या मानेला उपचारासाठी पट्टी लावण्यात आली आहे. शोएबचंही करावं तितकं कौतुक कमीच आहे. तो दीपिकाची पुरेपुर काळजी घेत आहे. तिच्या खाण्याकडे विशेष लक्ष देत आहे. व्लॉगमध्येही तो दीपिकाची जीवापेक्षा जास्त काळजी घेताना दिसला. व्हिडीओ पाहिल्यानंतर दीपिका लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून चाहते प्रार्थना करत आहेत.

Tags: bollywood newsdipika kakarentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Entertainment

Gambling enterprises mit Mastercard: A Convenient and Secure Repayment Alternative

जून 12, 2025 | 2:17 am
Entertainment

The Ultimate Overview to No Betting Deposit Perks

जून 12, 2025 | 2:16 am
Entertainment

Discover the Thrilling Globe of Blackjack Gamings for Enjoyable

जून 11, 2025 | 9:23 pm
Aamit bhanushali talk about father
Entertainment

काम मिळत नसताना वडिलांची साथ, आता तेच नाही म्हणत रडू लागला ‘ठरलं तर मग’मधील अर्जुन, डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडीओ

जून 11, 2025 | 6:30 pm
Next Post
Ishita Dutta Vatsal Sheth Become Parents

लग्नाच्या आठ वर्षांनी दुसऱ्यांदा आई-बाबा झाले इशिता दत्ता व वत्सल शेठ, दाखवली लेकीची झलक, अभिनेत्री म्हणाली, "आमचं कुटुंब…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.