शनिवार, मे 31, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

फक्त लिव्हर कॅन्सरच नाहीतर ‘या’ गंभीर आजाराशी झुंज देतेय दीपिका कक्कर, पतीनेच केला खुलासा, म्हणाला, “एकाच वेळी अनेक आजार…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 28, 2025 | 12:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dipika Kakar Health Update

फक्त लिव्हर कॅन्सरच नाहीतर 'या' गंभीर आजाराशी झुंज देतेय दीपिका कक्कर, पतीनेच केला खुलासा, म्हणाला, "एकाच वेळी अनेक आजार…"

Dipika Kakar Health Update : अभिनेत्री दीपिका कक्कर इब्राहिम तिच्या तब्येतीमुळे या दिवसात चर्चेत आहे. दीपिकाला यकृत कर्करोग झाला असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करुन याबद्दल माहिती दिली आहे. यानंतर, शोएब इब्राहिमने युट्युबवर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शोएब आणि दीपिका यांनी तिला झालेल्या आजाराबाबत सांगितले. बरेच दिवसांपासून दीपिकाची तब्येत ठीक नसल्याचे समोर आले. तिच्या यकृतामधील टेनिस बॉल इतका ट्यूमर असल्याची माहिती पती शोएब इब्राहिमने दिली. यानंतर आता दीपिकाच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दीपिकाला यकृताचा कर्करोग झाला असल्याच तिने पोस्ट शेअर करत सांगितलं.

शोएबने सांगितले की, आधी दीपिकाच्या पित्ताशयात खडे होते आणि त्यामुळे अभिनेत्रीला पोटदुखीचा त्रास होत होता. दीपिकाला एकाच वेळी अनेक आजार झाले आहेत. पित्ताशयातील खड्यांमुळे दीपिकाने तिच्या मुलाला रुहानला दूध पाजणं बंद केलं, त्यानंतर दीपिकाला ताप आला. दीपिकाला खूप ताप आल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यामुळे, दीपिकाची ट्यूमर शस्त्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आली. अंदाजे पुढी ल आठवड्यात दीपिकाच्या या ट्युमरवर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचं बोललं जात आहे.

आणखी वाचा – “दारू पिऊन…”, आक्षेपार्ह मॅसेज करणाऱ्या सुशील म्हशीलकरची लोकप्रिय संगीतकाराने बाजू घेताच प्राची पिसाट भडकली, म्हणाली, “त्याने मॅसेज केला तेव्हा…”

View this post on Instagram

A post shared by Dipika Kakkar 🔵 (@dipika_kakkar.official)

शोएब इब्राहिमने व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, “दीपिकाला होणारा पोटदुखीचा त्रास पित्ताशयातील खड्यांमुळे होता. पित्ताशयातील खड्यांमुळे वेदना सुरु झाल्या आणि नंतर तिचे हे दुखणे बरे झाले नाही. त्यानंतर आम्ही सीटीस्कॅन केलं. त्यानंतर आम्हाला कळलं की ट्यूमर आहे. आणि त्यानंतर कॅन्सरचं निदान झालं. या सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या खड्यांमुळे मला एक मोठी गोष्ट समजली. हा आम्हा सर्वांचा कठीण काळ आहे. आणि हा काळही निघून जाईल”.

आणखी वाचा – दीपिका कक्करला लिव्हर कॅन्सर, कुटुंबाला मोठा धक्का, आता अशा परिस्थितीमध्ये आहे अभिनेत्री, म्हणाली, “कठीण काळ…”

पुढे दीपिका म्हणाली, “प्रत्येकाला भीती वाटत आहे. मीसुद्धा खूप घाबरलो होतो. परंतु त्या दिवशी आम्ही रुग्णालयात बर्‍याच रूग्णांना पाहिले, आपण आपल्या सभोवतालची बरीच प्रकरणे ऐकतो आणि त्यातून मला धैर्य मिळत गेले. मी या संकटातून नक्की बाहेर पडेल. आता दीपिकाची ट्यूमर शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात केली जाईल”.

Tags: Dipika Kakar Health Updateentertainmenttelevision actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Yuvika Chaudhary Pregnancy
Lifestyle

युविका चौधरीसाठी गरोदर राहणं होतं इतकं कठीण, शेवटी IVF चा अवलंब करावा लागला कारण…

मे 30, 2025 | 6:30 pm
Bharti singh Harsh limbachiya
Entertainment

“आम्ही कर्ज काढून जगतोय”, भारती सिंह व तिच्या नवऱ्याचा वाईट काळ, स्वतःच केला खुलासा, कमी पैसे मिळतात अन्…

मे 30, 2025 | 6:27 pm
Gautami patil On Vaishnavi Hagawane
Social

“वैष्णवीबरोबर झालं ते चूक आहे”, गौतमी पाटील स्पष्टच बोलली, बैलासमोर नाचलेल्या व्हिडीओवरही केलं भाष्य, म्हणाली…

मे 30, 2025 | 5:24 pm
Kunal Kamra On Devendra Fadnavis
Entertainment

“चार लोकंही शो ऐकत नाहीत”, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर कुणाल कामराने सुनावलं, म्हणाला, “लवकरच मुंबईत शो करणार आणि…”

मे 30, 2025 | 4:19 pm
Next Post
Dipika kakar liver cancer

आईला कॅन्सर पण दोन वर्षाचा लेकालाही कळतोय त्रास, दीपिका कक्करने सांगितली परिस्थिती, मुलगा रुहान म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.