मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दीपिका कक्करला लिव्हर कॅन्सर, कुटुंबाला मोठा धक्का, आता अशा परिस्थितीमध्ये आहे अभिनेत्री, म्हणाली, “कठीण काळ…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 28, 2025 | 11:11 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dipika Kakar Health

दीपिका कक्करला लिव्हर कॅन्सर, कुटुंबाला मोठा धक्का, आता अशा परिस्थितीमध्ये आहे अभिनेत्री, म्हणाली, “कठीण काळ…”

Dipika Kakar Health : टेलिव्हिजन अभिनेत्री दीपिका कक्करच्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी आहे. अभिनेत्रीने स्वतः तिच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. बरेच दिवसांपासून दीपिकाची तब्येत ठीक नसल्याचे समोर आले. तिच्या यकृतामधील टेनिस बॉल इतका ट्यूमर असल्याची माहिती पती शोएब इब्राहिमने चाहत्यांना दिली होती. हा ट्युमर कर्करोगाचा आहे अशी माहिती अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत दिली. अभिनेत्रीच्या तब्येतीबाबत मोठी माहिती समोर आल्याने तिच्या चाहत्यांमध्ये काळजीच वातावरण पसरलं आहे. दीपिकाने सोशल मीडियावर एक लांबसडक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे आणि चाहत्यांनी तिच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे.

दीपिका कक्करच्या कर्करोगाची बातमी खरोखर धक्कादायक आहे. अभिनेत्रीची पोस्ट तिने पोस्ट करताच काही मिनिटांत व्हायरल झाली. चाहत्यांपासून सेलिब्रिटी चाहत्यांपर्यंत दीपिकाला धैर्य बाळगण्याचा सल्ला दिला आणि लवकरच तिला बरे करण्याची इच्छा व्यक्त केली. या बातमीने दीपिकाच्या कुटुंबासाठी खूप मोठा धक्का बसला आहे. राजीव अदतिया आणि आरती सिंग ते गौरव खन्ना आणि श्रद्धा आर्य पर्यंत अनेक सेलिब्रिटींना धक्का बसला असून ते दीपिकाला धैर्य देत आहेत.

आणखी वाचा – “कांदा विकून बाबा शाळेची फी भरणार होते पण…”, पावसात कांदा वाहून जाताच शेतकऱ्याच्या लेकीचा भावुक व्हिडीओ, स्वप्न पाहिलेली आणि…

View this post on Instagram

A post shared by Dipika (@ms.dipika)

दीपिकाने पोस्ट शेअर करत म्हटलं की, “तुम्हाला माहितीच आहे की, गेले काही आठवडे आमच्यासाठी खूपच कठीण गेले आहेत. माझ्या पोटात वरच्या भागात वेदना होत असल्याने मी रुग्णालयात दाखल झाले होते. यानंतर डॉक्टरांनी तपासणी करुन यकृतात (लिव्हर) टेनिस बॉलच्या आकाराचा ट्यूमर आहे असं सांगितलं होतं आणि आता हा ट्यूमर दुसऱ्या टप्प्यातील कर्करोगाचा (Stage 2 cancer) असल्याचं निदान झालं आहे. हा आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा कठीण काळ असून यातून मी नक्की बाहेर येईन. माझे कुटुंबीय माझ्या पाठिशी आहेत. तुमच्या प्रार्थनाही माझ्याबरोबर कायम असतील असा विश्वास आहे”.

आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव; अभिनेते म्हणाले, “हा सन्मान…”

दीपिकाच्या तब्येतीबाबत कळताच तिचा नवरा शोएबही पूर्णतः कोसळला आहे. मात्र, दीपिकाच्या या कठीण क्षणात तो तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि तिची काळजी घेत आहे. शोएबने दीपिकाला कॅन्सरचे निदान झाल्याचे कळताच एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, “अल्लाहच्या कृपेने, स्कॅन अहवाल स्पष्ट झाला आहे. व्हायरस किंवा त्याच्या पेशी शरीरात कोठेही पसरत नाहीत. जे काही आहे ते ट्यूमरपुरते मर्यादित आहे आणि एकदा ट्यूमर काढून टाकल्यानंतर, इंशाअल्लाह, गोष्टी अधिक चांगल्या होतील. आतापर्यंत, डॉक्टर असे म्हणत आहेत की सर्व काही नियंत्रणात आहे, तरी शेवटी अल्लाहला माहित आहे की भविष्यात काय घडणार आहे”.

Tags: Dipika Kakar Healthentertainmenttelevision actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Prachi Pisat On Rahul Ranade

"दारू पिऊन…", आक्षेपार्ह मॅसेज करणाऱ्या सुशील म्हशीलकरची लोकप्रिय संगीतकाराने बाजू घेताच प्राची पिसाट भडकली, म्हणाली, "त्याने मॅसेज केला तेव्हा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.