सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दारू पिऊन…”, आक्षेपार्ह मॅसेज करणाऱ्या सुशील म्हशीलकरची लोकप्रिय संगीतकाराने बाजू घेताच प्राची पिसाट भडकली, म्हणाली, “त्याने मॅसेज केला तेव्हा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 28, 2025 | 12:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prachi Pisat On Rahul Ranade

"दारू पिऊन...", आक्षेपार्ह मॅसेज करणाऱ्या सुशील म्हशीलकरची लोकप्रिय संगीतकाराने बाजू घेताच प्राची पिसाट भडकली, म्हणाली, "त्याने मॅसेज केला तेव्हा..."

Prachi Pisat On Rahul Ranade : सध्या मराठी मनोरंजन विश्वात अभिनेत्री प्राची पिसाटचा मुद्दा चर्चेत आहे. एका दिग्गज अभिनेत्याने प्राचीला अश्लील मॅसेज केल्याचा आरोप तिने करत थेट या आक्षेपार्ह संवादाचा स्क्रीनशॉट तिने शेअर केला आहे. प्रसिद्ध अभिनेते सुशील म्हशीलकर यांनी प्राचीला हे मॅसेज केले असल्याचं समोर आलं आहे. अद्याप सुशील यांनी या प्रकरणावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. प्राचीने उघड केलेल्या या प्रतिक्रियेनंतर मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. नेटकऱ्यांनी तसेच मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी प्राचीच्या या धाडसाचे कौतुक केले आहे. अनेक मराठी कलाकारांनी प्राचीला वैयक्तिक मॅसेज करत वा तिच्यासाठी पोस्ट शेअर करत तिला पाठिंबा दर्शविला आहे.

दरम्यान, प्राचीनेही त्यांना प्रतिउत्तर देत त्यांचे आभार मानले आहेत. इतकंच नाही तर, या पोस्टचे, मॅसेजचे स्क्रीनशॉट तिने इंस्टाग्रामवर शेअर करत आभार मानले. यांत अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये एका संगीतकाराने या प्रकरणावरुन केलेल्या मॅसेजचा स्क्रीनशॉटही तिने शेअर केला आहे. संगीतकार राहुल रानडेने प्राचीला या प्रकरणावरुन मॅसेज केले आहेत आणि सुशील यांना तो ओळखतो त्याने केलेले मॅसेज कदाचित दारू पिऊन केले असावेत असं म्हणत त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र प्राचीने राहुल यांच्या या मॅसेजवरही प्रतिउत्तर देत त्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे.

आणखी वाचा – दीपिका कक्करला लिव्हर कॅन्सर, कुटुंबाला मोठा धक्का, आता अशा परिस्थितीमध्ये आहे अभिनेत्री, म्हणाली, “कठीण काळ…”

राहुल रानडेने प्राचीला मॅसेज करत असं म्हटलं की, “हॅलो पीपी. सर्वत्र तुझीच चर्चा सुरु आहे. सध्या माध्यमांनी तुझा मुद्दा उचलून धरला आहे. खरं सांगायचं तर, मी सुदेशला वैयक्तिक ओळखतो. मला एक सांगशील का?, सुदेशने मॅसेज केला तेव्हा नेमकी काय वेळ होती?, कारण माणसं अशा प्रकारचे संभाषण तेव्हाच करतात जेव्हा ते दारू प्यायला बसतात”. यावर उत्तर देत प्राची म्हणाली, “अजून एक नमुना”, “तू वेडा आहेस का?, मला माझा मूलभूत अधिकार मिळवू दे. दारू पिऊन मुलींना मॅसेज करणे हे निमित्त नाही तर हा एक अत्याचार आहे. आणि कुठल्याही मुलीने तिचे वय, वेळ आणि परिस्थिती काहीही असो अत्याचार सहन करायचा ठेका घेतला नाही आहे. प्रत्येक मुलीला आवाज उठवण्याचा पूर्णतः अधिकार आहे आणि तिने लहान-मोठ्या कोणत्याही अत्याचारा विरोधात बोललंच पाहिजे. जर ही तुझी भावना असेल तर तुझेही दारू प्यायल्यानंतरचे किती संवाद बाहेर येतील हे तुलाही कळणार नाही”.

आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव; अभिनेते म्हणाले, “हा सन्मान…”

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

मराठी अभिनेते सुदेश म्हशीलकरांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून प्राचीला “तुझा नंबर पाठव ना, तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये कसली गोड दिसते आहेस. हल्ली खूपच सेक्सी दिसायला लागली आहेस. वाह” असा मॅसेज केला होता. प्राचीने याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर करत सुदेश म्हशीलकरांनी माफी मागावी असं देखील म्हटलं आहे. प्राचीला अनेक मराठी कलाकारांनी पाठिंबा देत या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत

Tags: entertainmentmarathi actressPrachi Pisat
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Dipika Kakar Health Update

फक्त लिव्हर कॅन्सरच नाहीतर 'या' गंभीर आजाराशी झुंज देतेय दीपिका कक्कर, पतीनेच केला खुलासा, म्हणाला, "एकाच वेळी अनेक आजार…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.