मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“वैष्णवीबरोबर झालं ते चूक आहे”, गौतमी पाटील स्पष्टच बोलली, बैलासमोर नाचलेल्या व्हिडीओवरही केलं भाष्य, म्हणाली…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 30, 2025 | 5:24 pm
in Social
Reading Time: 1 min read
google-news
Gautami patil On Vaishnavi Hagawane

"वैष्णवीबरोबर झालं ते चूक आहे", गौतमी पाटील स्पष्टच बोलली, बैलासमोर नाचलेल्या व्हिडीओवरही केलं भाष्य, म्हणाली...

Gautami patil On Vaishnavi Hagawane : आपल्या ठसकेबाज नृत्यामुळे नेहमीच चर्चेत असलेली लावणी क्वीन म्हणजे गौतमी पाटील. गौतमी पाटीलच्या नृत्याचे लाखो दिवाने चाहते आहेत. अशातच आता पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात गौतमी पाटीलच नाव ओढलं जात आहे. हगवणे कुटुंबीयांच्या एका लाडक्या बैलाच्या वाढदिवसाच्या दिवशी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाची चर्चा राज्यभरात झाली होती. बैलाच्या बर्थडे पार्टीला गौतमी चक्क बैलासमोर नाचली असल्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला. वैष्णवी आत्महत्या प्रकरणात हा व्हिडीओ लक्षवेधी ठरतोय. मात्र, या प्रकरणाशी गौतमीचा काहीही संबंध नसल्याचं तिने माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

बैलांसमोर नाचलेल्या कार्यक्रमाबाबत बोलताना गौतमी पाटील म्हणाली, “काही महिन्यांपूर्वी राजेंद्र हगवणेंनी एका कार्यक्रमासाठी मला बोलवलं होतं. त्यावेळी बैल जोड्यांच्या समोर मी नाचले होते. कोण आयोजक आहे, मी ते बघत नाही. मी फक्त तिथे जाऊन स्टेजवर परफॉर्म करते आणि निघून येते. माझं बाकीच्या गोष्टींशी काहीही घेणं देणं नसतं. माझी मार्केटिंग टीम याचे सर्व निर्णय घेते, मला यातलं यापूर्वी काहीही माहित नसतं”.

आणखी वाचा – “चार लोकंही शो ऐकत नाहीत”, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर कुणाल कामराने सुनावलं, म्हणाला, “लवकरच मुंबईत शो करणार आणि…”

वैष्णवी आत्महत्या प्रकरणाबाबत बोलताना ती म्हणाली, “ही घटना फार दुर्दैवी आहे. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झाली पाहीजे. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. कोणत्याही गोष्टी लपवू नका. जे काही असेल ते सांगत जा. जे काही असेल ते पुढे येऊन बोललं पाहिजे. हुंडा देणे, पैसे, गाड्या देणे हे चुकीचं आहे. मुलगी दिली ती घराची लक्ष्मी असते, हुंडा देणे हे चुकीचं आहे. मी त्याचा तीव्र विरोध करते, असंही गौतमी पाटील म्हणाली.

आणखी वाचा – “वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवलं नाही”, हगवणेंचा वकील ट्रोल होताच दिलं स्पष्टीकरण, म्हणाला, “पुरावे दाखवून…”

पुढे वैष्णवी म्हणाली, “वैष्णवीच्या वडीलांची प्रतिक्रिया पाहिली. ते ऐकून फार वाईट वाटलं. अशा निर्णयाने तुमच्या आयुष्यावर फक्त परिणाम होत नाही तर तुम्ही जो निर्णय घेता, जसे वागता त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. त्यामुळे काहीही असो सगळं सांगा. हुंडा घेणाऱ्यांनी देखील ती एक लक्ष्मी आहे, ती आपल्या घरी आली आहे, म्हणून तिच्याकडे पाहावं”, असं तिने म्हणत भावना व्यक्त केल्या आहेत.

Tags: gautami patilpune crime newsVaishnavi Hagawane death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Bharti singh Harsh limbachiya

“आम्ही कर्ज काढून जगतोय”, भारती सिंह व तिच्या नवऱ्याचा वाईट काळ, स्वतःच केला खुलासा, कमी पैसे मिळतात अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.