शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सहभागी झाले १६ स्पर्धक, कोणाला मिळतात सर्वाधिक पैसे, एकाचं मानधन आहे तब्बल…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 24, 2024 | 2:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss OTT 3

'बिग बॉस ओटीटी'मध्ये सहभागी झाले १६ स्पर्धक, कोणाला मिळतात सर्वाधिक पैसे, एकाचं मानधन आहे तब्बल…

‘बिग बॉस OTT ३’ला सुरुवात झाली असून सध्या या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या अनिल कपूर यांनी ‘बिग बॉस’च्या घरात अनेक बदल केले आहेत, जे प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. अनिल कपूरने होस्ट केलेल्या या शोमध्ये तब्बल १६ स्पर्धकांनी प्रवेश केला आहे. हा कार्यक्रम सुरु झाला तेव्हापासून यांत रोज एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. यावेळी सहभागी झालेले १६ स्पर्धक एकापेक्षा एक आहेत. (Bigg Boss OTT 3)

यंदाच्या ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी प्रवेश केला आहे. या १६ स्पर्धकांमध्ये अरमान मलिक, कृतिका मलिक, पायल मलिक, टीव्ही अभिनेता सई केतन राव, वडा पाव गर्ल चंद्रिका दीक्षित, पौलमी दास, सना सुलतान, पत्रकार दीपक चौरसिया, सना मकबूल, लव कटारिया, शिवानी कुमारी, सोनम खान, नीरज गोयत, टॅरो कार्ड रीडर मुनिषा खटवानी, विशाल पांडे आणि रॅपर नावेद शेख यांचा समावेश आहे.

आणखी वाचा – ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात अरमान मलिकचा त्याच्या दोन बायकांसह प्रवेश, सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, म्हणाली, “‘बिग बॉस’ला झालंय काय?”

View this post on Instagram

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

हे सर्व स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. यंदाच्या ‘बिग बॉस’मध्ये सर्वात जास्त मानधन घेणारा स्पर्धक नेमका कोण आहे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. तो एखादा कलाकार किंवा YouTuber नाही. तर त्याजागी पत्रकार दीपक चौरसिया यांचे नाव आहे. ‘न्यूज २४’ च्या रिपोर्टनुसार, दीपक चौरसिया यावेळी शोमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्पर्धकांपैकी एक आहेत. दीपक चौरसियानंतर कृतिका मलिक, अरमान मलिक, विशाल पांडे, नेझी, रणवीर शौरी, लव कटारिया आणि सना मकबूल यांचाही या यादीत समावेश आहे.

आणखी वाचा – ना महागडा लेहंगा, ना अवाढव्य खर्च; सोनाक्षी सिन्हाच्या ग्रँड रिसेप्शन सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांची गर्दी, कार्यक्रमात नक्की काय काय घडलं?

दीपक चौरसिया यांच्याबद्दल सांगायचे तर ते प्रसिद्ध पत्रकार आहेत. २००३ मध्ये त्यांनी डीडी न्यूजमध्ये संपादक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. यानंतर ते अनेक प्रसिद्ध मीडिया संस्थांशी जोडले गेले. पुरस्कार विजेते पत्रकार अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. काही वर्षांपूर्वी दीपक चौरसिया यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते नशेत असताना बातम्या वाचत होते. दरम्यान चुकीची बातमी वाचून शो तात्काळ बंद करण्यात आला. यामुळे त्यांची नोकरी गेली होती. याशिवाय त्यांच्यावरुन अनेक वादही झाले आहेत.

Tags: anil kapoor showbigg bossBigg Boss OTT 3bigg boss ott 3 highest paid contestatentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Marathi and Bollywood actor Nana Patekar revealed he smokes around 60 cigarettes in a one day.

“दिवसाला ६० सिगारेट आणि दारु...”, व्यसनाच्या आहारी गेलेले नाना पाटेकर, म्हणाले, “वासामुळे माझ्या गाडीत...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.