बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“गोळीबार, खून, ड्रग्ज…”, महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीवर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “आपला महाराष्ट्र कधीच असा नव्हता अन्…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 26, 2024 | 12:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tejaswini Pandit commented on the current politics and social situation by X post

"गोळीबार, खून, ड्रग्ज...", महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीवर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, "आपला महाराष्ट्र कधीच असा नव्हता अन्..."

गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात अनेक घडामोडी घडताना दिसून येत आहेत. गेल्या अनेक दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणाची व राजकारण्यांची पातळी घसरलेली पाहायला मिळत आहे. त्यात नुकताच अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येने अवघा महाराष्ट्र हादरला. महाराष्ट्रातील या राजकीय व सामाजिक परिस्थितीवर सामान्य नागरिकांसह अनेक कलाकार मंडळीदेखील त्यांचे मत व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने या सर्व परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

अलीकडच्या काळात अनेक मराठी कलाकार राजकारण, समाजकारण यावर ठामपणे आपली भूमिका मांडताना पाहायला मिळतात. यापैकी एक कलाकार म्हणजे अभिनेत्री तेजस्विनी पंडीत. गेले काही दिवस तेजस्विनी सध्याचे राजकारण व समाजकारणावर तिची ठाम भूमिका मांडताना दिसत आहे. अशातच तिने नुकतीच केलेली एक एक्स (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.  गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात झालेले गोळीबार व नुकतेच पुण्यात सापडलेलं सर्वात मोठं ड्रग्ज रॅकेट यावर तेजस्विनीने नाराजी व्यक्त केली आहे.

दुष्काळ, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न वर्षानुवर्ष सतावत आहेतच…
आता सर्रास गोळीबार , खून, ड्रग्ज….?

असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता ????

— TEJASWWINI (@tejaswwini) February 25, 2024

आणखी वाचा – मुहूर्त ठरला, मंडपही सजला! सिद्धार्थ-तितीक्षाच्या लग्नाची जय्यत तयारी, ‘या’ ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात होणार लग्न

तेजस्विनीने तिच्या पोस्टच्या माध्यमातून राज्यातील सद्य सामाजिक स्थितीबाबत मोठा सवाल उपस्थित केला आहे. तसेच आपला महाराष्ट्र असा कधीच नव्हता असं मत मांडत तिने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तेजस्विनीने तिच्या या पोस्टमध्ये नाराजी व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “दुष्काळ, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न वर्षानुवर्षे सतावत आहेतच… आता सर्रास गोळीबार, खून, ड्रग्ज….? आपला महाराष्ट्र असा कधीच नव्हता”.

आणखी वाचा – मेहंदी है रचनेवाली! पूजा सावंतच्या हातावर रंगली सिद्धेशच्या नावाची मेहंदी, अभिनेत्रीच्या खास लूकने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल

दरम्यान, तेजस्विनीची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तेजस्विनीच्या या पोस्टखाली अनेक संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत. कुणी तेजस्विनीच्या या पोस्ट पाठिंबा दिला आहे. तर कुणी तेजस्विनीला तिच्या या पोस्टला कमेंट्स करत असहमती दर्शवली आहे.   

Tags: marathi actressmarathi entertainment newsMarathi newstejaswini panditतेजस्विनी पंडीतमराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Chahat Khanna Personal life
Entertainment

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जून 4, 2025 | 6:00 pm
Nivedita saraf talk about ashok saraf
Entertainment

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

जून 4, 2025 | 5:48 pm
Dipika Kakar Health
Entertainment

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

जून 4, 2025 | 4:24 pm
Jaya bachchan angry on paparazzi
Entertainment

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

जून 4, 2025 | 3:29 pm
Next Post
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate

"कलाकारासाठी खूप मोठं…", डोंबिवलीमध्ये मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी, दोघंही भारावले, म्हणाली, "आमच्याही चेहऱ्यावर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.