Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात पहिल्या आठवड्यातच स्पर्धकांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. तर नुकताच ‘बिग बॉस’च्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. या टास्कमध्ये तन्वीने सागर कारंडेला नॉमिनेट केलं. यादरम्यान तन्वी आणि सागरमध्ये मोठा वाद झालेला पाहायला मिळाला. यानंतर ही गोष्ट अनेक प्रेक्षकांना खटकली. अशातच यासंदर्भात अभिनेत्री आणि ‘बिग बॉस मराठी ३’ ची स्पर्धक सोनाली पाटील हिने देखील प्रतिक्रिया दिली आहे. ज्या स्पर्धकाला नॉमिनेट करायचे त्याचा फोटो असणारी पतंग कापून नॉमिनेशन बॉक्समध्ये टाकायची असा हा टास्क होता. या पहिल्याच टास्कमध्ये तन्वी सागरची पतंग कापते.
तर सोनालीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत सोनाली पाटील म्हणाली, “मित्रांनो ‘बिग बॉस मराठी ६’ हा शो सध्या सगळेजण बघत आहेत. आज मी प्रोमोसुद्धा पाहिला होता. आणि आजचा एपिसोड सुद्धा आता पाहिला. तन्वी कोलतेने आज जे काही स्वतःचं रंगरुप दाखवलं आहे. ती वेगळी गोष्ट आहे. पण, ज्यावेळी ती सागर कारंडेवर जोरात ओरडली. याची खरंच काही गरज नव्हती. सागरने आजवर जे काही काम केलं आहे. त्यानुसार विचार केला तर तन्वीचा टोन एकदम हाय होता. ती त्याला बोलून ही देत नव्हती. कदाचित तिने बिग बॉस’च्या आधीच्या सीझनच्या आणि विशेषतः हिंदी सीझनचा जरा जास्तच अभ्यास केला आहे, किंवा कदाचित ती अशा काही स्पर्धकांना भेटून आली असेल. पण, या तन्वीने पहिल्याच दिवसापासून काय रुप धारण केलं ते खरंच कळत नाही.” (Bigg Boss Marathi 6)
तसेच सोनाली पाटीलच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीसुद्धा भरहरुन कंमेंट्स केल्या आहेत. अनेक कंमेंट्स करत तन्वीला ट्रोल केल्याचं पाहायला मिळत आहे. तन्वीचेआडनाव आहे कोलते म्हणून ती सर्वांशी उद्धट बोलते, शेवटी यमक जुळलं, बरोबर आहे सोनाली ताईंचं, एकच नंबर सोना, ती तन्वी उगाच आवाज चढवते आणि फालतूची ग्रुपबाजी सुरू केलीये अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत. (Bigg Boss Marathi 6)



