रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ब्राह्मण असून मुस्लीम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने लग्नानंतरची सांगितली सत्य परिस्थिती, म्हणाल्या, “लग्नानंतर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 17, 2024 | 1:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tanvi Azmi On Wedding

"ब्राह्मण असून मुस्लीम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे…", सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने लग्नानंतरची सांगितली सत्य परिस्थिती, म्हणाल्या, "लग्नानंतर…"

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी इतर धर्मातील मुलांसह लग्नगाठ बांधली आहे. विशेषतः कलाकार मंडळींनी एका धर्मातून दुसऱ्या धर्मात लग्न केल्यानंतर अनेकदा गदारोळ होतो. बऱ्याच वर्षांपूर्वी एका अभिनेत्रीबरोबरही असंच घडलं होतं. या अभिनेत्रीच्या विरोधात अनेक लोक गेले पण तिने आपले प्रेम सोडले नाही. ही अभिनेत्री म्हणजे तन्वी आझमी. तन्वी एक ब्राह्मण महाराष्ट्रीयन कुटुंबातील मुलगी आहे. बॉलिवूडमध्ये अनेक उत्तम भूमिका साकारत तन्वीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यामुळे तिला वेगळी ओळख मिळाली. तन्वीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. (Tanvi Azmi On Wedding)

‘इंडियन एक्स्प्रेस’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तन्वीने सांगितले की, बालपणात ती खूप शांत आणि आज्ञाधारक मुलगी होती पण सुरुवातीपासूनच तिच्या रक्तात बंडखोरी होती पण ती बंडखोरी तिने कधी बाहेर येऊ दिली नाही. मात्र, एक वेळ अशी आली की ती बंडखोरी बाहेर पडली. तन्वी पुढे म्हणाली, “लग्न झाल्यावर मी बंडखोर झाले. कारण तेव्हा खूप काही घडले होते. एका ब्राह्मण महाराष्ट्रीयन मुलीने मुस्लीम पुरुषाशी लग्न केल्यामुळे मला संपूर्ण मुंबई भडकल्यासारखी वाटली आणि माझ्यासाठी हे जग संपले, तेव्हापासूनच बंड सुरु झाले आणि ते कधीच संपले नाही”.

आणखी वाचा – अप्पीने बनवलेल्या जेवणाची चव सात वर्षांनी अर्जुन ओळखणार का?, अमोल मुलगा असल्याचं सत्य लवकरच समोर येणार

View this post on Instagram

A post shared by Tanvi Azmi (@tanviazmiofficial)

तन्वीने कैफी आझमी यांचा मुलगा बाबा आझमी यांच्याशी लग्न केले होते. शबाना आझमी त्यांच्या वहिनी आहेत. कुटुंबात स्थायिक होण्याबाबत तन्वी म्हणाली, “अशा कुटुंबाचा एक भाग बनून खूप छान वाटतं, पण त्यांनी मला कधीच निराश केलं नाही. इतरांनी जे साध्य केले आहे ते मिळवण्याची मला गरज आहे असे मला त्यांनी कधीच वाटू दिले नाही. हा एक प्रवास आहे. जोपर्यंत मला चांगले काम मिळेल तोपर्यंत मी माझ्या प्रवासात आनंदी आहे. आव्हानात्मक काम असणाऱ्या गोष्टींवर माझा अधिक लक्ष व भर असेल. माझ्या कुटुंबातील या व्यक्तीने एवढं केलं आहे, हे केलं आहे, याकडे माझं लक्ष कधीच नसतं”.

आणखी वाचा – Video : गावची पूजा, वाडीत जेवणाची पंगत अन्…; कोकणातल्या गावी गेल्यावर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने जपला साधेपणा, व्हिडीओ व्हायरल

तन्वी यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘दिल दोस्ती दिलामा’ या वेब सीरिजमध्ये ती दिसली आहे. ज्यामध्ये तिने आजीची भूमिका साकारली होती. ही मालिका Amazon Prime या ओटीटीवर रिलीज झाली आहे.

Tags: bollywood actresstanvi azmitanvi azmi and baba azmiTanvi Azmi On Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Sushant Shelar Meet PM

मुंबई दौऱ्यामध्ये सुप्रसिद्ध मराठी अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, नमस्कारही केला अन्…; म्हणाला, "आयुष्यतला हा क्षण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.