शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अप्पीने बनवलेल्या जेवणाची चव सात वर्षांनी अर्जुन ओळखणार का?, अमोल मुलगा असल्याचं सत्य लवकरच समोर येणार

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 16, 2024 | 2:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Appi Amachi Collector Promo

अप्पीने बनवलेल्या जेवणाची चव सात वर्षांनी अर्जुन ओळखणार का?, अमोल मुलगा असल्याचं सत्य लवकरच समोर येणार

‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत एकामागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत सात वर्षांचा लीप आलेला पाहायला मिळत आहेत. तेव्हापासून मालिका रंजक झाली आहे. अप्पी व अर्जुन यांचा मालिकेत सात वर्षांचा दुरावा दूर होताना लवकरच पाहायला मिळणार आहे. मालिकेत अप्पी व अर्जुनची भेट झालेली असते. मात्र अमोलबद्दल अप्पी अर्जुनला काहीच सांगत नाही. अर्जुनला सात वर्षांपूर्वी अप्पीने वचन दिलेलं असतं. ते वचन अप्पी पाळत असते. तर इकडे अर्जुन समर कॅम्प घेतो तिथे त्याची अमोलबरोबर ओळख होते. अमोलची ओळख समर कॅम्पमध्ये सिम्बा अशी असल्याने अर्जुन त्याला ओळखत नाही. (Appi Amachi Collector Promo)

अप्पी अमोलला चपाती आणि मेथीची भाजी बनवून देते. अमोल टिफिन घेऊन समर कॅम्पला जातो. तेव्हा मधल्या सुट्टीमध्ये अमोलला चपाती भाजी खाऊन बोर झालेलं असतं त्यामुळे आईने दिलेला टिफिन त्याला खायचा नसतो. तितक्यात समोर अर्जुन बसलेला असतो आणि तितक्यात अर्जुनचं पार्सल येतं. अर्जुनने टिफिन आणलेला नसतो म्हणून अर्जुन बाहेरुन पार्सल मागवतो. आणि ते अमोल पाहतो. तेव्हा अमोल डब्बा न खाण्यासाठी शक्कल लढवतो आणि टिफिन घेऊन अर्जुनकडे जातो.

आणखी वाचा – अहिल्यादेवींना भिडणार सूर्यकांत कदम, श्रीकांतला किडनॅप करुन खेळली चाल, प्रत्युत्तर देणार का?, नेमकं काय घडणार?

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

अर्जुनला जाऊन अमोल बोलतो, मास्तर हे बघा मी तुमच्यासाठी डब्बा आणला आहे. हे ऐकून अर्जुन त्याला विचारतो, तुझा डब्बा मी खाल्ला तर तू काय खाणार?, यावर अमोल अर्जुनने मागवलेल्या पार्सलकडे पाहतो आणि सांगतो की, मी चायनीस खाणार. त्यानंतर दोघेही खाली डब्बा खायला बसतात. तेव्हा अर्जुन अमोलच्या डब्यातील चपाती-भाजीचा एक घास खातो, तेव्हा अमोल म्हणतो, माझी माँ बेस्ट जेवण बनवते. यावर अर्जुन सात वर्ष मागे गेलो एकदम असं मनात बोलताना दिसतो.

आणखी वाचा – अधिपतीही सरगम मॅडमच्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार का?, अक्षराचा संसार मोडण्यासाठी भुवनेश्वरीचे जोरदार प्रयत्न, प्रेम बहरणार का?

सात वर्षांनी अप्पीने बनवलेल्या जेवणाची चव अर्जुन ओळखू शकणार का?, अर्जुनला अमोल त्याचा मुलगा असल्याचं सत्य समजणार का?, अमोलसाठी अर्जुन व अप्पी एकत्र येणार का?, हे सर्व मालिकेत पाहणं रंजक ठरेल.

Tags: appi amachi collectorAppi Amachi Collector Promoentertainmentmarathi serialzee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Rajinikanth's daughter Aishwarya and son-in-law Dhanush were separated due to their extramarital affairs

रजनीकांत यांच्या लेकीचा मोडला संसार, लग्नानंतरही दोघांचंही दुसऱ्या व्यक्तीबरोबर सुरु होतं अफेअर, बारमध्ये जायचे अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.