रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वर्षभरापूर्वीच वडिलांचे कर्करोगाने निधन अन् आता अभिनेत्रीलाही ब्रेस्ट कॅन्सर, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा कठीण काळ, लेकही राहते दूर…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 11, 2025 | 12:16 pm
in Women
Reading Time: 3 mins read
google-news
Tannishtha Chatterjee Breast Cancer

वर्षभरापूर्वीच वडिलांचे कर्करोगाने निधन अन् आता अभिनेत्रीलाही ब्रेस्ट कॅन्सर, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा कठीण काळ, लेकही राहते दूर…

Tannishtha Chatterjee Breast Cancer : प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका तनिष्ठा चॅटर्जी हिच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेत्री सध्या एका मोठया आजरपणातून जात आहे. गेल्यावर्षीच तिने तिचे वडील गमावले आणि आता ती कर्करोगाचा बळी ठरली आहे. तनिष्ठाला स्टेज ४ स्तनाचा कर्करोग झाला आहे. जेव्हा तनिष्ठाला याबद्दल माहिती मिळाली तेव्हा ती पूर्णपणे खचून गेली. एका मुलाखतीत तिने अलीकडेच कर्करोगाबद्दल सांगितले आहे. तनिष्ठाने सांगितले की, आजारपणानंतर ती आपल्या मुलीबद्दल खूप काळजीत आहे. वडिलांचे कर्करोगाने निधन आणि त्यानंतर अभिनेत्रीला कर्करोगाने झालेला त्रास या सगळ्याच गोष्टी एकामागोमाग झाल्याने तिची मनस्थिती बिघडली.

‘टाईम्स ऑफ इंडिया’शी विशेष संभाषणात तनिष्ठा हिने आपल्या कर्करोगाबद्दल सांगितले. चार महिन्यांपूर्वी तनिष्ठाला कर्करोगाबद्दल माहिती मिळाली. ती म्हणाली, “मी माझ्या वडिलांना कर्करोगाने गमावले. माझ्या आजाराबद्दल मला कळले त्या धक्क्यातून मी सावरत होते. माझ्या आयुष्यात सर्व काही बिघडले आहे. पण मी खचलेली नाही. मी यातून मानवता शिकले आहे. लोक तुमची काळजी घेतात. मी प्रथमच बलवान बनून थकले आहे”.

आणखी वाचा – सहा महिन्यांनी देवोलीना भट्टाचार्जीने दाखविला लेकाचा चेहरा, हुबेहूब आईसारखाच दिसतो आणि…; लूक पाहून नेटकरी हैराण

View this post on Instagram

A post shared by Tannishtha Chatterjee (@tannishtha_c)

पुढे ती म्हणाली, “गेल्या वर्षी, कर्करोगामुळे मी माझे वडील गमावले. मला त्याच्या मृत्यूबद्दल शोकही वाटला नाही. कारण माझ्याकडे ७० वर्षांची आई आणि ९ वर्षांची मुलगी सांभाळायला आहे. मला त्यांच्यासाठी मजबूत राहायचे आहे. ज्या दिवशी मला स्टेज 4 स्तनाच्या कर्करोगाबद्दल कळले, मला वाटले की हे माझ्या बाबतीत का घडले. मी अशी कोणती कर्म केली आहेत?, जे अशाप्रकारचे दुःख माझ्या वाट्याला आले आहे”.

आणखी वाचा – लग्नाच्या आठ वर्षांनी दुसऱ्यांदा आई-बाबा झाले इशिता दत्ता व वत्सल शेठ, दाखवली लेकीची झलक, अभिनेत्री म्हणाली, “आमचं कुटुंब…”

तनिष्ठाने पुढे सांगितले की तिने आपल्या मुलीला बहिणीसह अमेरिकेत पाठविले आहे. ती म्हणाली, “तिला माझ्यापासून दूर जायचे नव्हते पण तिचे बालपण वाईट व्हावे अशी माझी इच्छा नव्हती. तिने स्वत: ला एकटे समजू नये अशी माझी इच्छा होती. माझी अशी इच्छा आहे की माझ्याव्यतिरिक्त, तिच्यावर प्रेम करणारे अधिक लोक आहेत याची तिला कायम जाणीव असावी”.

Tags: breast cancerentertainmentTannishtha Chatterjee
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
arbaaz khan on sshura pregnancy

“खूप वर्षांनी बाबा होतोय, चिंता आहे पण...”, पहिल्यांदाच दुसऱ्या बायकोच्या प्रेग्नंसीबाबत बोलला अरबाज खान, ५७व्या वर्षी बाबा होणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.