शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सैराट’ फेम तानाजी गळगुंडे होणार बाबा?, गुपचूप लग्नाची चर्चा झालेल्या मुलीने शेअर केले डोहाळजेवणाचे फोटो, नक्की सत्य काय?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 6, 2025 | 5:52 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tanaji Galgunde Goodnews

'सैराट' फेम तानाजी गळगुंडे होणार बाबा?, गुपचूप लग्नाची चर्चा झालेल्या मुलीने शेअर केले डोहाळजेवणाचे फोटो, नक्की सत्य काय?

Tanaji Galgunde Goodnews : ‘सैराट’ या चित्रपटाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अनेक वर्ष होऊनही हा चित्रपट आजही कोणी विसरलेलं नाही. या चित्रपटातील गाण्यांनी तर साऱ्यांना वेड केलं. आजही या चित्रपटातील ‘झिंग झिंग झिंगाट’ हे गाणं लागलं की साऱ्यांचे पाय थिरकतात. या चित्रपटातील सगळेच कलाकार नवोदित होते. मात्र या चित्रपटाच्या भरघोष यशानंतर या कलाकारांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. आजही या चित्रपटातील आर्ची, परशा आणि त्यांचे मित्र यांच्या चर्चा रंगलेल्या आहेत.

रिंकू राजगुरू व आकाश ठोसर यांच्यासह आणखी लंगड्या आणि सल्या या दोन पात्रांनाही विशेष लोकप्रियता मिळाली. लंगड्या हे पात्र या चित्रपटात अभिनेता तानाजी गळगुंडे याने साकारलं होतं. तानाजीचे या चित्रपटाने आयुष्य बदललं. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सोशल मीडियावरही तानाजी बऱ्यापैकी सक्रिय असतो. यामुळे तो अनेकदा चर्चेतही आला आहे. मात्र आता तानाजी एका विशेष कारणाने चर्चेत आला आहे.

आणखी वाचा – प्राजक्ता गायकवाडच्या साखरपुड्याची जोरदार तयारी, हातावर रंगली होणाऱ्या नवऱ्याच्या नावाची मेहंदी, नाव आहे…

तानाजीचे वैयक्तिक आयुष्य सध्या चर्चेत आलं आहे. तानाजीच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची चर्चा सुरु आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षा शेट्टीबरोबर तो लिव्ह इन मध्ये राहत असल्याच्या चर्चा होत्या. गेल्या पाच-सहा वर्षांपासून ते एकत्र आहेत. प्रतिक्षाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिने तानाजी बरोबरचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे अर्थातच त्यांचं काहीतरी नातं असल्याचं कळतंय.

आणखी वाचा – लाईव्ह परफॉर्मन्स सुरु असतानाच अंतर्वस्त्र फेकलं आणि…; कलाकारानेच दाखवलं नेमकं काय घडलं, व्हिडीओ व्हायरल

सूत्रानुसार, त्यांनी गेल्यावर्षी लग्न केलं असल्याचं म्हटलं. मात्र याबाबत त्यांनी कोणालाही सांगितलं आहे. वा कोणतेही फोटो समोर आले नाहीत. अशातच आता प्रतीक्षाच्या अकाऊंटवरून तिने तिचे डोहाळ जेवणाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून आता तानाजी बाबा होणार का असा प्रश्न साऱ्यांना पडला आहे. तानाजीने त्याच्या या नात्याबाबत काहीही सांगितलेलं नसलं तरी अद्याप या चर्चांना उधाण आलं आहे.

Tags: entertainmentmarathi actorTanaji Galgunde Goodnews
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
vivek sangle new home

सुंदर सजावट, आकर्षक इंटेरियर अन्…; 'लग्नानंतर होईलंच…' फेम अभिनेत्याने मुंबईत घेतलं स्वतःचं घर, व्हिडीओद्वारे दिसली झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.