सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुंदर सजावट, आकर्षक इंटेरियर अन्…; ‘लग्नानंतर होईलंच…’ फेम अभिनेत्याने मुंबईत घेतलं स्वतःचं घर, व्हिडीओद्वारे दिसली झलक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 7, 2025 | 10:47 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
vivek sangle new home

सुंदर सजावट, आकर्षक इंटेरियर अन्…; 'लग्नानंतर होईलंच…' फेम अभिनेत्याने मुंबईत घेतलं स्वतःचं घर, व्हिडीओद्वारे दिसली झलक

vivek sangle new home : मुंबईसारख्या शहरात स्वतःच हक्काचं घर घेणे हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. अगदी सर्वसामान्यांपासून ते कलाकार मंडळींनाही मुंबईत आपलं घर असावं असं वाटतं. पण बरेचदा आर्थिक अडचणींमुळे हे स्वप्न अपुरं राहतं, तर काहींची हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीची धडपड मात्र सुरुच असते. अशी अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांनी मुंबईत स्वतःच घर घेत त्यांचं एक स्वप्न पूर्ण केलं आहे आणि याबाबत त्यांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. अशातच आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याने मुंबईत नवं घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी समोर आली आहे.

मुंबईसारख्या शहरात स्वतःच हक्काचं नवं घर घेणारा हा अभिनेता म्हणजेच मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा विवेक सांगळे. विवेकने आजवर अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ‘देवयानी’ या मालिकेपासून सुरु झालेला विवेकचा प्रवास आता ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेपर्यंत येऊन पोहोचला आहे. या मालिकेत विवेक जीवा देशमुख ही भूमिका साकारत आहे. विवेकने घर घेतलं असल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईतील लालबाग परिसरात त्याने हे घर घेतलं असल्याचं दिसतंय.

आणखी वाचा – प्राजक्ता गायकवाडच्या साखरपुड्याची जोरदार तयारी, हातावर रंगली होणाऱ्या नवऱ्याच्या नावाची मेहंदी, नाव आहे…

विवेकचे घर डिझाईन करणाऱ्या elemets 5 design studio या कंपनीच्या पेजवरुन विवेकच्या नव्या घराची झलक पाहायला मिळाली. इतकंच नाही तर हे घर विवेकने लालबागमध्ये घेतलं असल्याचं दिसत आहे. त्याचे घर डेकोरेट करणाऱ्या टीमने विवेकला शुभेच्छा देतानाचा फोटोही शेअर केला आहे, आणि ‘हॅप्पी न्यू होम’ असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे. यावरुन विवेकने नवं घर घेतलं असल्याचं स्पष्ट झालं. शिवाय त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याच्या घराची झलकही पाहायला मिळाली.

आणखी वाचा – ‘सैराट’ फेम तानाजी गळगुंडे होणार बाबा?, गुपचूप लग्नाची चर्चा झालेल्या मुलीने शेअर केले डोहाळजेवणाचे फोटो, नक्की सत्य काय?

विवेकचे हे आलिशान असं घर खूप सुंदर पद्धतीने डेकोरेट केलं असल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तम फर्निचर, सुंदर सजावट असलेलं हे विवेकच घर खूपच खास आहे. अभिनयक्षेत्रात कोणताही वारसा नसताना स्वमेहनतीच्या जोरावर विवेकने आपलं स्थान निर्माण केलं. आणि यांत प्रगती करत त्याने स्वतःच घर घेण्याचं स्वप्नही पूर्ण केलं. विवेकच्या घरी गणरायाचं आगमन होतं, त्यामुळे यंदाचा विवेकचा बाप्पा हा त्याच्या नव्या घरात पाहायला मिळेल.

Tags: marathi actornew homevivek sangle
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
farah khan cook dilip

कॅमेरा बंद असताना फराह खान कशी वागते?, कुक दिलीपनेच केला खुलासा, म्हणाला, "खूप वाईट…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.