Tamil Actor Bala : तामिळ व मल्याळम अभिनेता बाला याने अनेक चित्रपटांमध्ये आपले दमदार अभिनय कौशल्य दाखवत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. बाला त्याच्या व्यावसायिक जीवनात कमालीचा यशस्वी असला तरी त्याचे वैयक्तिक आयुष्य हे नेहमीच चर्चेत राहिलेले पाहायला मिळाले. आता नव्याने या अभिनेत्याबाबत आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अभिनेत्याने आता तिसरे लग्न केले असल्याचं समोर आलं आहे. बालाच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता एर्नाकुलम येथील कलूर पावकुलम मंदिरात बालाचे तिसरे लग्न झाले. लग्नसोहळ्यात फोटो सध्या व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत.
बालाने मंदिरात अगदी साधेपणाने लग्न केलेलं पाहायला मिळालं. अभिनेत्याच्या लग्नाला फक्त कुटुंबीय व जवळचे मित्र उपस्थित होते. यावेळी बालाने चेन्नई येथील त्याची नातेवाईक कोकिलासह लग्न केले आहे. कोकिळा ही त्याच्या आईच्या नात्यातील असून त्याच्या मामाची मुलगी आहे. लग्नानंतर बालाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा फोटोही शेअर केला आहे. फोटोमध्ये अभिनेता पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यात दिसत आहे, तर त्याची पत्नी कोकिला मरुन कॉम्बिनेशन साडी नेसलेली दिसत आहे.
यावेळी बालाच्या पत्नीने सोन्याचे दागिनेही घातले आहेत. या सोहळ्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिनेता बाला म्हणाला, “कोकिला ही माझी नातेवाईक आहे आणि माझी आई आमच्याबरोबर हा आनंद साजरा करायला हवी होती. ती ७४ वर्षांची आहे आणि तिची तब्येत खराब आहे, पण खरंच या लग्नामुळे कोकिलाचं स्वप्न पूर्ण झालं आहे जे तिने तिच्या लहानपणापासूनच जपलं होतं.
आणखी वाचा – Video : “आज आई-वडील असते तर…”, पुरस्कार स्वीकारताना ‘शिवा’ला अश्रू अनावर, तिला पाहून उपस्थितही रडले अन्…
बालाचे वैयक्तिक आयुष्य खूपच आव्हानात्मक होते. बालाचे पहिले लग्न गायिका अमृता सुरेशसह झाले होते पण मतभेदांमुळे त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर त्यांनी एलिझाबेथ उदयनशी लग्न केले. मात्र, त्यांच्या लग्नाची नोंदणी झाली नाही. आता तिसऱ्यांदा बालाने तिची नातेवाईक कोकिलाशी लग्न केले आहे. लग्नातील बाला व त्याच्या पत्नीचा साऊथ इंडियन लूक सध्या बराच व्हायरल होत आहे.