बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दयाबेन परतणार?, ‘तारक मेहता…’च्या निर्मात्यांचा दयाबेनबरोबरचा व्हिडीओ व्हायरल, पाहताच चर्चांना उधाण

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 11, 2025 | 1:16 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

दयाबेन परतणार?, 'तारक मेहता…'च्या निर्मात्यांचा दयाबेनबरोबरचा व्हिडीओ व्हायरल, पाहताच चर्चांना उधाण

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेला नुकतीच १७ वर्ष पूर्ण झाली आहेत. ही मालिका २८ जुलै २००८ ला सब सोनी वर प्रसारित झाली होती. बघता बघता या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर १७ वर्ष राज्य केलं. या मालिकेतील सर्वच पात्र फार मजेशीर आहेत. गड़ा कुटुंब, भिड़े कुटुंब, सिंह कुटुंब, पोपट लाल, अब्दुल, डॉ. हाथी, मिस्टर अँड मिसेस अय्यर आणि मिस्टर अँड मिसेस मेहता ही सगळीच कुटुंब एकत्र एका सोसायटीमध्ये धुमाकूळ घालताना दिसतात. भारतातील विविध धर्मातील लोकं एकाच सोसायटी मध्ये एकत्र कुटुंब पद्धतीने राहतात. त्यांच्या रोजच्या जीवनात येणाऱ्या समस्येवर एकत्र येऊन ते कसे मात करतात आणि त्यातली गंमत यावर आधारित ही मालिका लोकांचं मनोरंजन करणारी आहे. त्यातील प्रेक्षकांचं पसंतीच पात्र म्हणजे दया.

मालिका सुरु झाल्यापासून दयाने आपल्या भूमिकेने आणि विनोदी अंदाजाने रसिकांच्या मनावर राज्य केलं. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मालिकेतील दयाबेन हे पात्र गायब असल्याचं दिसतंय. त्यानंतर दयाबेन या मालिकेत पुन्हा केव्हा परतणार याकडे अनेकांचे डोळे लागून राहिले होते. बरेचदा मालिकेतील कलाकारांनाही याबाबत विचारण्यात आले पण हवे तसे उत्तर काही मिळाले नाही. दरम्यान आता दयाबेन पुन्हा मालिकेत परतणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

आणखी वाचा – “मी सदैव तुझं रक्षण करेन”, ‘ठरलं तर मग’च्या सेटवर जुईला खास व्यक्तीने बांधली राखी, अभिनेत्रीचं होतंय कौतुक

कुछ रिश्ते किस्मत बुनती है… ख़ून का नहीं, दिल का नाता होता है ❤️! #dishavakani सिर्फ हमारी ‘दया भाभी’ नहीं, बल्कि मेरी बहन है। सालों से हंसी, यादें और अपनापन बांटते हुए ये रिश्ता स्क्रीन से कहीं आगे बढ़ चुका है। इस राखी पर, वही अटूट भरोसा और वही गहरा अपनापन फिर से महसूस हुआ…
ये… pic.twitter.com/3nws0gm0lc

— Asit Kumarr Modi (@AsitKumarrModi) August 10, 2025

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओने या चर्चांना उधाण आलं आहे. या व्हिडीओमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चे निर्माते असित मोदी दयाबेनच्या घरी गेले होते. हा व्हिडीओ पाहून दिशा असित मोदींच्या शब्दाखातर मालिकेत परतणार का याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. दिशा व्यतिरिक्त तिचे संपूर्ण कुटुंब देखील तिथे उपस्थित होते. यावेळी, दिशा आणि असित यांचे रक्षाबंधन पाहायला मिळाले. असित यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. आणि म्हटलं आहे की, “काही संबंध नशीब विणतात. रक्त नव्हे तर हृदय. फक्त आमची ‘दया भाभी’ नव्हे तर माझी बहीण. हे नाते स्क्रीनच्या पलीकडे गेले आहे, हास्य, आठवणी आणि परिचितता शेअर करीत आहे”.

आणखी वाचा – “अपघात झाला, गाडी बंद पडली आणि…”, मराठी अभिनेत्याचा गाडीचा अपघात, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “तासभर मदत मिळालीच नाही”

दयाबेन म्हणजेच दिशा वकानी यांनी लग्नानंतर २०१७ मध्ये एका मुलीला जन्म दिला. त्याच वेळी, ती शोपासून विभक्त झाली, त्यानंतर ती आजपर्यंत शोमध्ये परतली नाही. प्रत्येक प्रसंगी, प्रेक्षक केवळ तिचीच आठवण काढतात तर सोशल मीडियावरील पोस्ट देखील शेअर करतात, बर्‍याच वेळा असे वृत्त होते की दिशा लवकरच शोमध्ये परत येईल परंतु अद्याप तसे झाले नाही.

Tags: dayabendisha vakaniTaarak Mehta Ka Ooltah Chashmah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Next Post
Sumona Chakravarti body image

केस पांढरे झाले, हॉर्मोन्स बदलले आणि…; सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने शरीराला घेऊन सहन केलाय त्रास, म्हणाली, "नकारात्मक विचार…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.