T20 World Cup Final 2024 : टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने शानदार विजय मिळवल्याने देशभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा आनंद सगळेजण साजरा करताना दिसत आहेत. या ऐतिहासिक विजयासाठी सर्वच जण आनंदी आहेत. अभिषेक बच्चन, अनन्या पांडे, रवीना टंडन, अजय देवगण यांसारख्या बॉलीवूड कलाकारांनीही टीमचे अभिनंदन केले आहे, तर अनुष्का शर्मानेही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन तिच्या पतीसाठी एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे.
अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले आहे की,“आमच्या मुलीने आज सामना संपल्यावर या सगळ्या खेळाडूंना टीव्हीवर रडताना पाहिलं. यावेळी या खेळाडूंना धीर देण्यासाठी तिथे कोणी असेल का?, असा प्रश्न तिने विचारला. मी तिला म्हणाले, हो डार्लिंग. कारण, आज जवळपास १.५ बिलियन प्रेक्षकांनी आपल्या खेळाडूंना मिठी मारली आहे. आपल्या टीमने अभूतपूर्व विजय मिळवला आणि सगळ्यांनी या सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. चॅम्पियन्स अभिनंदन”, असं म्हणत तिने साऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
तर खास विराटसाठी पोस्ट शेअर करत तिने असंही म्हटलं आहे की, “माझं या माणसावर खूप प्रेम आहे. विराट कोहली. तू माझा आहेस हे सांगताना मला प्रचंड आनंद होतो. आता हा आनंद साजरा करण्यासाठी माझ्यासाठी स्पार्कलिंग वॉटर घेऊन ये”. नकुल मेहता, प्रियांका चोप्रा, भूमी पेडणेकर, फुक्रा इन्सान आणि इतरांनी या पोस्टवर रेड हार्ट इमोजी शेअर करत पसंती दर्शिविली आहे.त्याचवेळी, ती क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विजयानंतर विराट कोहलीने अनुष्का शर्मा, मुलगी वामिका आणि मुलगा अकाय यांना व्हिडीओ कॉल केला आहे आणि त्यांच्याशी बोलत आहे. आणि तो प्रत्येक सामन्यानंतर असे करतो. ज्याला पाहून सगळेच त्याचे चाहते होतात. यादरम्यान विराट त्यांना फ्लाइंग किसही देत आहे.
Virat Kohli on a call with his lovely wife Anushka Sharma and his kids. ♥️#INDvSA #INDvsSA #INDvsSA2024 #INDvsSAFinal #INDvSAFinal #ViratKohli𓃵 pic.twitter.com/ooZi57qgb0
— 𝐀𝐧𝐤𝐢𝐭 𝐒𝐡𝐚𝐫𝐦𝐚 𝕏(𝓥𝓲𝓻𝓪𝓽¹⁸ Fan) (@Ankit_S1111) June 29, 2024
विराट कोहलीने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. २९ जून रोजी झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करुन ट्रॉफीवर विजय मिळवला आणि दुसरा T20 विश्वचषक जिंकला. या विजयाबद्दल कार्तिक आर्यन, अर्जुन रामपाल, रुपाली गांगुली, अजय देवगण आणि इतर कलाकार सोशल मीडियावर टीम इंडियाचे अभिनंदन करत आहेत.