शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ज्या पुलावर फोटो काढले,तोच वाहून गेला”पूरस्थितीवर स्वातीने सोडलं मौन

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 14, 2023 | 4:50 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
swati deval story

swati deval story

सध्या कलाकारांचं व्हॅकेशन मोड सुरु आहे. बरेच कलाकार आपल्या कुटुंबासोबत भारतात वा भारताबाहेर दौरा करण्यात व्यस्त आहेत. अशातच अभिनेत्री स्वाती देवल तिच्या कुटुंबासोबत हिमाचल प्रदेश येथे फिरायला गेली होती. काही दिवसांपासून उत्तरेकडील राज्यात अतिवृष्टीने माजवलेल्या हाहाकाराने रौद्ररूप धारण केलं आहे. या राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. अशातच काही दिवसांपूर्वीच जाऊन आलेल्या अभिनेत्री स्वाती देवल हिने या पूरजन्यक परिस्थितीवर भाष्य केलं आहे. (swati deval story)

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील मीनाक्षी या पात्रामुळे अभिनेत्री स्वाती देवल हिला विशेष ओळख मिळाली. स्वातीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत उत्तरेकडील राज्यावर ओढवलेल्या संकटावर भाष्य केलं आहे. काही आठवड्यांपूर्वी स्वाती तिच्या कुटुंबाबरोबर हिमाचल, शिमला, कुल्लू या ठिकाणी फिरण्यासाठी गेली होती. मात्र आता या ठिकाणाची झालेली अवस्था पाहून तिने हळहळ व्यक्त केली आहे.

पाहा पूरस्थितीवर काय म्हणाली स्वाती (swati deval story)

स्वातीने पोस्ट करत लिहिलं आहे की, ‘आहे…. या शब्दात वर्तमान जीव, प्राण, अर्थ आहे… पण ‘होतं’ यात भूतकाळ… मागच्याच महिन्यात अगदी २ आठवडे तर झालेत फक्त… हिमाचल, शिमला, सिस्सू, कुल्लू आणि मनिकरण पाहिलं… आणि टीव्हीवर त्याच रस्त्यांची, वसाहतींची वाताहत पाहून मन भरुन आलं… ज्या रस्त्यांवर उभं राहून तिथल्या सौंदर्याला मनात, फोटोत कैद केले त्याची फार दुरवस्था झाली आहे. किंबहुना फक्त खुणा राहिल्या आहेत. ज्या गुरुद्वाराच्या पुलावर उभे राहून फोटो काढले. तोच वाहून गेला… संपलं क्षणात?

मन खिन्न झालं… ज्यांचं नुकसान झालं, त्यांना देव पुन्हा उभारण्याची हिंमत देवो. त्या ट्रीपमध्ये आमच्यारोबर असणाऱ्या ड्रायव्हरचं घर हिमालयमध्ये आहे. त्यांची चौकशी केली…ते बरे आहेत कळल्यावर थोडं बरं वाटलं”. या सोबत स्वातीने तेथील त्यांचे फिरतानाचे अनेक फोटोस आणि व्हिडीओज ही पोस्ट केले आहेत.

हे देखील वाचा – त्यांनीच खरंतर लोकशाही धोक्यात आणली ! सचिन गोस्वामींची फेसबुक पोस्ट चर्चेत

स्वातीने केलेली ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. स्वातीने हिमाचल प्रदेश येथील अनेक फोटोज आणि व्हिडीओज चाहत्यांसोबत पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये स्वाती तिचा पती तुषार आणि तिचा लेक पाहायला मिळाला. स्वातीचा पती ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील प्रसिद्ध संगीत संयोजक आणि संगीतकार आहे.

Tags: himachal pradesh floodsswati devaltushar deval
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Amruta Khanvilkar

'पण त्यावेळी वडिलांनी परवानगी दिली नाही'अमृताने शेअर केला किस्सा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.