शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझा मृत्यूही झाला असता…”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’विषयी बोलताना रणदीप हुड्डाचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “बेशुद्ध पडायचो आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 11, 2024 | 10:58 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
randeep hudda on transformation

“माझा मृत्यूही झाला असता...”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’विषयी बोलताना रणदीप हुड्डाचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “बेशुद्ध पडायचो आणि...”

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या भूमिकेसाठी कठोर परिश्रम घेतेले आहेत. ‘दंगल’चा आमिर असो किंवा ‘दम लगाके हैशा’मधील भूमी पेडणेकर. यामध्ये आता एक नवीन अभिनेत्याचे नाव सामील झालेले पाहायला मिळत आहे. तो अभिनेता म्हणजे रणदीप हुड्डा. रणदीपचा नुकताच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचीदेखील खूप पसंती मिळाली आहे. या चित्रपटामध्ये त्याने स्वातंत्र्यवीर सावकरांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याने तब्बल २६ किलो वजन कमी केले होते. त्याबद्दल आता रणदीपने स्वतः भाष्य केले आहे.  (randeep hudda on transformation)

गेल्या महिन्यात रणदीपचा स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये रणदीपने स्वतः मुख्य भूमिका साकारली असून त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने पहिल्यांदाच दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्याचा एक ट्रान्सफॉर्मेशनचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये त्याने आपले वजन खूप कमी केले असल्याचे दिसून आले होते. त्याचा व्हिडीओ व्हायरल होताच सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर त्याने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ट्रान्सफोर्मेशनबद्दल दिलखुलासपणे गप्पा मारल्या. तो म्हणाला की, “ही भूमिका माझ्यासाठी खूप जोखमीची होती. मी याआधी ‘सरबजीत’ या चित्रपटासाठी वजन कमी केले होते. पण ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’साठी वजन कमी करणे हे अधिक कठीण होते”.

आणखी वाचा- Video : एकीने चिमटा काढला तर दुसरीने मारली कानाखाली, बेडवरच देशपांडे सिस्टर्सची मारामारी, गौतमी जोरजोरात ओरडू लागली अन्…; व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

पुढे तो म्हणाला की, “माझे वजन ९२ किलो होते. या चित्रपटासाठी मी ६० किलो वजन कमी केले. यासाठी मला प्रत्येक दिवसाला १ किलो वजन कमी करायचे होते. हे माझ्यासाठी खूप कठीण होते. मी खूप कमकुवत झालो होतो. अनेकदा यामुळे मी कधी कधी बेशुद्धदेखील पडायचो”.

आणखी वाचा – आज प्रीती योग, आयुष्मान योगामुळे ‘या’ राशींना होणार आर्थिक गुंतवणूकीचा फायदा, तर कुणाच्या नशिबात नेमकं काय? जाणून घ्या…

तसेच त्याने सांगितले की, “हे एखाद्या कलाकारांसाठी खूप कठीण असते जेव्हा त्याला एखाद्या भूमिकेसाठी खाण्यापिण्यापासून लांब राहावे लागते. मी या चित्रपटासाठी स्वतःलाच विसरून गेलो होतो. या सर्व प्रक्रियेमध्ये माझा मृत्यू होईल असेदेखील मला वाटायचे. पण माझ्या मेहनतीचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. मी सोशल मीडियावर फोटो अपलोड करताच त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला होता. हा फोटो पाहून चाहत्यांनी माझी तुलना हॉलिवूड क्रिश्चीयन बॅल बरोबर केली होती”.

दरम्यान रणदीपच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळाला. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.  

Tags: swatantryaveer sawarkarweight loss
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi new twist promo out on social media

नेत्राच्या हातून अस्तिकाचा अंत, अस्तिकाच्या मृत्यूने विरोचकालाही धक्का, मालिकेला नवीन वळण, आता पुढे काय घडणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.