Swanand Tendulkar and Gautami Deshpande Wedding : अभिनेत्री गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर ही जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. नुकताच त्यांच्या लग्नसोहळा थाटात पार पडला असून त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गेले काही दिवस त्यांच्या मेहंदी, संगीत व हळदी सोहळ्याचे अनेक क्षण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत होते. त्यांचे हे फोटो पाहून अनेकांना त्यांच्या लग्नाची आतुरता लागली होती आणि अखेर ही लोकप्रिय जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अल्पावधीतच या फोटोंना तुफान प्रतिसाद मिळाला आहे.
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने आधीपासूनच पुढाकार घेत गौतमीच्या लग्नाची जय्यत तयारी केल्याचे पाहायला मिळाले. मृण्मयीने त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात केल्यामुळेच गौतमी-स्वानंद यांच्या रिलेशनविषयी व लग्नाविषयी साऱ्यांनाच खबर लागली. या दोघी बहीणींचा बॉण्ड हा खूपच खास असून सोशल मीडियाद्वारे त्यांच्यातील बॉण्ड नेहमीच पाहायला मिळाला आहे. अशातच मृण्मयीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – पेस्टल रंगाचा पोशाख, टेम्पल ज्वेलरी अन् मोत्यांच्या मुंडावळ्या; गौतमी-स्वानंदच्या लग्नाचा लूक ठरतोय लक्षवेधी
गौतमीच्या लग्नात बहीण मृण्मयीने कानपिळीचा व गौतमी-स्वानंद यांची लग्नगाठ बांधण्याचा विधी पार पाडला. यावेळी मृण्मयीने घेतलेल्या खास उखण्याने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेत्रीने हा खास उखाणा घेत असे म्हटले की, “आयुष्यभरासाठी बांधली आहे घट्ट गाठ, स्वप्नीलने जशी माझी नाही सोडली, तशीच स्वानंद कधीच सोडून नको गौतमीची साथ.” मृण्मयीच्या या खास उखाण्यावर साऱ्यांनीच टाळ्या वाजवत दाद दिली.
आणखी वाचा – गौतमीच्या संगीत सोहळ्यात आईने गायलं खास गाणं, आईच्या गाण्यावर देशपांडे सिस्टर्सनी धरला ठेका
मृण्मयीने घेतलेल्या या खास उखाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाआधीचे अनेक विधी सोशल मीडियावर चाहत्यांना पाहायला मिळत होते. त्यामुळे चाहत्यांना यांच्या लग्नाची चांगलीच उत्सुकता लागली होती आणि अखेर ही जोडी विवाहबंधनात अडकली आहे. त्यामुळे चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे. या व्हायरल फोटोंवर गौतमी-स्वानंदच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.