मराठी इंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय सुयश टिळक सध्या टॉप अभिनेत्यांपैकी एक असून नाटक, सिनेमा, वेबसिरीज व छोटा पडदा या सर्वच माध्यमातून त्याने अप्रतिम भूमिका करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. ‘का रे दुरावा’ मालिकेतून तरुणींच्या दिल की धाडकन बनलेल्या सुयशचं ‘मी स्वरा आणि ती दोघं’ हे नाटक रंगभूमीवर सुरु असून नाटकातील त्याच्या अभिनयाचं प्रेक्षक मनापासून कौतुक करतायत.(Suyash Tilak On Marathi Drama)
सुयश त्याच्या सहजपूर्ण अभिनयासोबत स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. आता सुयशने मराठी नाटकांच्या प्रयोगावेळी होणाऱ्या अडचणींबद्दल आपले मत व्यक्त केले. त्याचबरोबर त्याने नाट्यगृहाच्या दुरावस्थेबरोबर नाटकाचे प्रयोग रद्द होण्यामागचं कारण सांगितलं.

पत्रकार सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टला नुकतीच सुयशने मुलाखत दिली. यावेळी पत्रकार सौमित्र पोटे यांनी सुयशला नाट्यगृहाच्या दुरावस्थेबद्दल विचारताना त्याने ह्या अडचणी सांगण्याबरोबरच ऐन नाटकांच्या प्रयोगावेळी होणाऱ्या शासकीय कार्यक्रमांवर टीका केली.
पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत सुयश म्हणतो, की नाट्यगृहांबद्दल ज्यांनी खरंतर सक्रिय काम केलं पाहिजे ते काम करत नाहीत, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. अनेक वेळा आमचे प्रयोग शासनाच्या कार्यक्रमांमुळे रद्द केले जातात. महिना-दीड महिना आधी तारीख घेतलेली असते, पण त्या कार्यक्रमांमुळे तीन दिवस आधीच रद्द झाल्याचे सांगतात. म्हणजेच, नाटकांना, कलाकारांना किंवा त्यांच्या ठरलेल्या प्रयोगांना काहीच महत्व नसतं. शासकीय कार्यक्रमांमुळे प्रयोग रद्द होतात, त्यामुळे बुकिंग्स रद्द, परिणामी निर्मात्यांना मोठं नुकसान सहन करावा लागतं, असं सुयश म्हणतो.(Suyash Tilak On Marathi Drama)
हे देखील वाचा – अमेरिकेतही हास्यधुमाकूळ घालण्यासाठी हास्यविर सज्ज
तसेच ही नाट्यगृह जेव्हा तुम्ही तुमच्या कार्यक्रमांसाठी वापरता, तेव्हा ती नाट्यगृह चांगल्या स्थितीत ठेवण्याची जबाबदारीही कुणीतरी उचलली पाहिजे. जी कोणीही घेताना दिसत नाही. कारण त्यांच्यासाठी ते तीन तास महत्वाचे असतात. आणि त्यांच्या मेकअप व अन्य सोयीसुविधांसाठी काही जण प्रशस्त दालन बुक करतात. बाहेर व्हॅनिटी व्हॅन लागते, त्यामुळे त्यांना ग्रीन रुममध्ये डोकावंच लागत नाही. मी यावर अनेकदा बोललो, लिहिलंय, पण त्यात काहीही बदल होत नसल्याचं सुयश म्हणाला.