शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘गदर २’बरोबर ‘OMG २’ प्रदर्शित होऊ नये म्हणून सनी देओलने अक्षय कुमारला केली होती विनंती, पण अभिनेत्याने मात्र…; म्हणाला, “काम मिळत नसताना…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 2, 2023 | 3:24 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Sunny Deol talks about Gadar 2 movie clash with OMG 2

'गदर २'बरोबर 'OMG २' प्रदर्शित होऊ नये म्हणून सनी देओलने अक्षय कुमारला केली होती विनंती, पण अभिनेत्याने मात्र…; म्हणाला, "काम मिळत नसताना…"

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’च्या नव्या सीझनला नुकतीच सुरुवात झाली. या सीझनच्या पहिल्या भागात रणवीर सिंह व दीपिका पदुकोण ही क्युट जोडी आली होती. यावेळी दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल आणि लग्नाबद्दल अनेक खुलासे केले होते. तसेच, तिने तिच्या अफेअरबद्दल बोलताना एक वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे ती जोरदार ट्रोल झाली होती. आता या लोकप्रिय शोच्या नवीन भागात सनी देओल आणि बॉबी देओल यांनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये सनीने त्याच्या ‘गदर २’ चित्रपटाबद्दल बोलताना मोठा खुलासा केला आहे. (Sunny Deol talks about Gadar 2 movie clash with OMG 2)

सनी देओलचा ‘गदर २’ आणि अक्षय कुमारचा ‘OMG २’ गेल्या ऑगस्टमध्ये प्रदर्शित झाला होता. दोन्ही चित्रपटांना जरी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी कमाईच्या बाबतीत ‘गदर २’ने ‘OMG २’ला मागे टाकले होते. सनीच्या ‘गदर २’ ने देशभरातील बॉक्स ऑफिसवर तब्बल ५२४ कोटींची कमाई करत एक विक्रम रचला होता. तर अक्षयच्या चित्रपटाने जवळपास १४० कोटींची कमाई केली होती. जरी या दोन्ही चित्रपटांना चांगलं यश मिळालं असलं, तरी या क्लॅशचा परिणाम दोघांना सहन करावा लागला. आता बऱ्याच महिन्यानंतर अभिनेत्याने दोन चित्रपटांच्या क्लॅशवर आणि अक्षय कुमारबद्दल बोलला आहे.

हे देखील वाचा – Shah Rukh Khan Birthday : मध्यरात्री मन्नतबाहेर हजारो चाहत्यांची गर्दी, ‘ते’ दृश्य पाहून शाहरुख खानलाही यावं लागलं बाहेर, म्हणाला, “रात्री उशिरापर्यंत…”

View this post on Instagram

A post shared by ZEE5 (@zee5)

नुकतंच या शोचा नवीन भाग प्रसारित झाला. ज्यामध्ये तो अक्षय कुमारला त्याच्या ‘OMG २’ चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यासाठी फोन केला होता. सुरुवातीला करणने सनीच्या ‘गदर २’ चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आणि याबद्दल एक प्रश्न विचारला होता. त्यावर सनी म्हणाला की, “माझ्या चित्रपटासह दुसरा चित्रपट येऊ नये, असं मला मनापासून वाटत होतं. मात्र आपण यावर काहीही करू शकत नाही. ज्याचं आपल्याला दुःख होतं. नंतर मी विचार केला की, ‘जर या क्लॅशचा चित्रपटावर काही फरक पडणार नसेल, तर आपण त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे.’ त्यावेळेस मला वाटायचं की, जर माझ्या चित्रपटाबरोबर एखादा चित्रपट आला नाही, तर तुम्हाला किमान चित्रपटगृहे तरी मिळतील.”

हे देखील वाचा – Video : राहुल देशपांडेंच्या लेकीचं इंग्रजी भाषेतील बोलणं ऐकून कलाकार मंडळीही भारावले, बोलताना थांबलीच नाही अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

पुढे तो अक्षय बरोबरच्या संवादाबद्दल बोलताना म्हणाला, “मी अक्षयला त्याचा चित्रपट पुढे ढकलण्याची विनंती केली होती. तेव्हा तो म्हणाला की, ११ ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय माझा नाही, तर स्टुडिओचा आहे. आणि तसंही दोन चित्रपट एकत्र प्रदर्शित होतात. तेव्हा मी त्याला ठीक आहे. तुला शुभेच्छा देतो. फक्त मी विनंती करू शकतो, त्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही.” सनीचा हे वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आलेलं आहे. सनीचा ‘गदर २’ चित्रपट २००१ मध्ये आलेल्या ‘गदर :एक प्रेमकथा’चा सिक्वेल होता. ज्यात त्याच्यासह अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा प्रमुख भूमिकेत होते.

Tags: akshay kumargadar 2 moviekoffee with karanomg 2 moviesunny deolsunny deol gadar 2Sunny Deol talks about Gadar 2 movie clash with OMG 2
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Sayaji shinde talk about sindoor operation
Entertainment

“मतदान नीट केलं असतं तर हे झालंच नसतं”, पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूरवर सयाजी शिंदेंचं मोठं वक्तव्य, नक्की काय म्हणाले?

मे 8, 2025 | 3:06 pm
Sambhavna Seth Says Miscarriage
Entertainment

डॉक्टरांच्या चुकीमुळे पोटातच बाळ गेलं, १५ दिवस कळलंच नाही अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर धक्कादायक प्रकार, जीवाशी खेळ

मे 8, 2025 | 1:30 pm
Next Post
Manasi Naik On Divorce

घटस्फोटादरम्यान करवा चौथ केल्याबाबत नको नको ते बोलले, पण मानसी नाईकने अखेर दिलं स्पष्टीकरण, म्हणाली, "नव्या नवरीला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.