बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“नातवंड खेळवण्याच्या वयात…”, गोविंदाच्या अफेअरवर बायकोचं मोठं विधान, म्हणाल्या, “६२ वर्षांचा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 22, 2025 | 4:44 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sunita Ahuja Talks Aout Govinda  Affair

"नातवंड खेळवण्याच्या वयात…", गोविंदाच्या अफेअरवर बायकोचं मोठं विधान, म्हणाल्या, "६२ वर्षांचा…"

Sunita Ahuja Talks Aout Govinda  Affair : बॉलिवूड अभिनेता गोविंदा अभिनयाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहतो. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता त्याच्या वैयक्तिक नात्यामुळे चर्चेत राहिला आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्या नात्यात दुरावा आली असल्याची अनेक महिन्यांपासून बातमी कानावर येत आहे. दोघांच्या लग्नाला आजवर ३८ वर्ष पूर्ण झाली आहेत. दोघांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक अफवा सतत कानावर येत होत्या. त्यांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं अशीही चर्चा होती. दरम्यान, त्यांच्या या नात्याबाबत गोविंदाची पत्नी सुनीता वेळोवेळी स्पष्टीकरण देताना दिसली. सुनीताने या चर्चा अफवा असल्याचं म्हणत फेटाळल्या. पण सुनीता यांनी गोविंदा आणि त्यांच्या नात्यात वाद सुरु असले तरी त्यांना कोणी वेगळे करु शकत नाही, असंही म्हटलं.

काही दिवसांपूर्वीच गोविंदाचं एका मराठी अभिनेत्रींबरोबर अफेअर असल्याचा खुलासा त्याच्या पत्नीने मुलाखतीदरम्यान केला. यावेळी गोविंदा डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळालं. या सर्व चर्चांवर आता गोविंदाची पत्नी सुनीता हिने केलेलं भाष्य लक्ष वेधून घेत आहे. यावेळी गोविंदाचे अफेअर करण्याचे हे वय नाही, असं सुनीताने स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा – प्रेमविवाह करण्याची चूक, नणंदेने संशय घेतला अन्…; मृत्यूपूर्वी वैष्णवी हगवणेने मैत्रिणीला काय काय सांगितलं?, घटस्फोट घेईन म्हणत…

View this post on Instagram

A post shared by Ssunita Ahuja (@sunita.ahuja.7583)

एका व्हिडीओमध्ये सुनीता गोविंदाच्या अफेअरबद्दल बोलत आहेत. त्या म्हणाल्या की, “हो, मी ऐकलं आहे की हे होत आहे, ते होत आहे. पण या सर्व फालतू गोष्टी आहेत. हे अफेअर करण्याचं वय नाही. गोविंदा ६२ वर्षांचा आहे. आता त्याचं आजोबा व्हायचं वय आहे. टीनाचं लग्न करायचे आहे. नातवंड बघायची आहेत. हे सर्व करण्याची ही वेळ नाही”.

आणखी वाचा – करवलीचा नखरा! भावाच्या लग्नात कार्तिकी गायकवाडचीच हवा, हळदीच्या ड्रेसपुढे नवरीही फिकी

गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या लग्नाला ३८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी ११ मार्च १९८७ रोजी लग्न केलं होतं. त्यांना टीना आणि यशवर्धन ही दोन मुले आहेत. २०२५ च्या सुरुवातीला त्यांच्या नात्याबद्दल अनेक अफवा पसरल्या. तेव्हापासून गोविंदाच्या चाहत्यांमध्ये काळजीच वातावरण पाहायला मिळालं. त्यांचं ३८ वर्षांचं नातं तुटणार की काय ही भीती साऱ्यांना वाटू लागली. मात्र सुनीता यांनी त्यांना आणि गोविंदाला कोणीही वेगळं करु शकत नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.

Tags: bollywood actorentertainemnt newsGovinda Affair
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Hemant dhome on vaishnavi hagawane death case

“तिच्या आई-बापाचीही चूक कारण... ”, वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “हुंडाबळी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.