शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बेपत्ता कॉमेडियन सुनील पाल सापडताच पत्नीचं भाष्य, पत्रकार परिषद घेत करणार मोठा खुलासा, नेमकं प्रकरण काय?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 4, 2024 | 10:21 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sunil Pal

बेपत्ता कॉमेडियन सुनील पाल सापडताच पत्नीचं भाष्य, पत्रकार परिषद घेत करणार मोठा खुलासा

Sunil Pal : कॉमेडियन सुनील पाल यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या अनेक तासांपासून ते बेपत्ता होते. मंगळवार, ३ डिसेंबर रोजी त्यांची पत्नी ते हरवल्याची तक्रार देण्यासाठी मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात पोहोचली होती. त्यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, अभिनेता एक शो करण्यासाठी शहराबाहेर गेला होता आणि नंतर म्हणाला की, तो ३ डिसेंबरलाच परत येईल. मात्र त्याचा फोन बंद झाल्याने आणि कोणीही त्याच्याशी संपर्क साधू शकलं नाही, तेव्हा कॉमेडियन सुनील पाल यांच्या पत्नीने पोलीस ठाणे गाठले. मात्र, सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आणि अद्याप हरवल्याची तक्रार दाखल झालेली नाही.सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून कॉमेडियनच्या जवळच्या लोकांशी बोलून त्याचा ठावठिकाणा, त्याचे शो आणि तो कोणाशी संवाद साधतो याची माहिती गोळा केली जात आहे.

सुनील पाल यांच्या पत्नीने ‘दैनिक भास्कर’ला सांगितले की, कॉमेडियन बरा असून तो दिल्लीहून मुंबईला येत आहे. पोलिसांशीही बोलणे झाले आहे. आणि ४ डिसेंबरला ते आणि त्यांची पत्नी पत्रकार परिषद घेऊन सर्व काही सांगतील. सुनीलच्या पत्नीने सांगितले की पोलिसांनी कॉमेडियनचा फोन नंबर ट्रेस केला होता, ज्याने त्याचे लोकेशन उघड केले आणि तो एका जाळ्यात अडकल्याचे उघड झाले, ज्याबद्दल तो पत्रकार परिषदेत सांगेल. सुनील पाल यांनी अनेक कॉमेडी शोमध्ये आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. याशिवाय सुनील पाल यांनी चित्रपटांमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.

आणखी वाचा – स्वप्नील जोशीने घेतली आलिशान महागडी कार, खास व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, “माझ्यासाठी ही फक्त गाडी नाही तर…”

‘फिर हेरा फेरी’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘बॉम्बे टू गोवा’ आणि ‘किक’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये त्यांनी केवळ उत्कृष्ट अभिनयच केला नाही तर आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खूप हसवले आहे. सुनील पाल हे शेवटचे ‘तेरी भाभी है पहले’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झाला होता. यानंतर सुनील बराच काळ पडद्यापासून दूर राहिले. मात्र अभिनेते सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपल्या कॉमेडी आणि अभिनयाबरोबर सुनील पाल आपल्या वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असतात.

आणखी वाचा – 04 December Horoscope : रवि योगामुळे सिंह राशीसह ‘या’ राशींचेही भाग्य उजळणार? कुणाच्या नशिबात काय? जाणून घ्या…

अनेक विनोदी कलाकार आणि अभिनेत्यांविरोधात ते नेहमीच उघडपणे बोलत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये, सुनील पाल यांनी कॉमेडी या संकल्पनेवर त्यांच्या स्पष्ट मतांमुळे लक्ष वेधून घेतले आहे. आणि आता त्यांच्या बेपत्ता झाल्याची बातमीही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Tags: bollywood gossipSunil Palsunil pal missing
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Paaru Marathi Serial Update

Paaru Marathi Serial : मारुतीचा पारूवर संशय, पुरस्कार घ्यायला जाण्यासही अडवलं, आदित्य हा गुंता सोडवू शकेल का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.