प्रमुख हिंदू सणांपैकी एक सण म्हणजे दिवाळी सणाला नुकतीच सुरुवात झाली. या सणानिमित्त सर्वत्र एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी आकाश कंदील व विद्युत रोषणाई, तसेच फटाक्यांची आतिषबाजी होतानाचे चित्र सध्या दिसत आहे. केवळ सर्वसामान्य नव्हे, तर कलाकार मंडळींमध्येही या सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. ही मंडळी त्यांच्या चाहत्यांसह फोटोज व व्हिडीओज शेअर करत आहेत. अशात मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अक्षया नाईकची दिवाळी यंदा वेगळ्या पद्धतीने साजरी होत असून इन्स्टाग्रामवर तिने याचे काही फोटो शेअर केले आहे. (Akshaya Naik celebrates Diwali in Chawl)
‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अक्षयाची यंदाची दिवाळी खूपच वेगळी आहे. कारण, यंदा ती तिची दिवाळी तिच्या बालपणीच्या घरी साजरी करत आहे. दिवाळीनिमित्त अक्षया तिच्या चाळीतील घरी पोहोचली. यावेळी ती तिच्या कुटुंबियांसह यंदाची दिवाळी साजरी करताना दिसली. नुकतंच तिने इंस्टाग्रामवर दिवाळी साजरी करतानाचे काही फोटोज शेअर केले. ज्यामध्ये ती तिच्या चाळीतील घराबाहेर आकाश कंदील लावताना दिसली. त्याचबरोबर तिने तिच्या कुटुंबियांसह एक फोटो शेअर केला, ज्यात तिच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा – Video : नवऱ्याला लाथ मारली, नको नको ते बोलली अन्…; अंकिता लोखंडेचा स्वत:वरचा ताबा सुटला, म्हणाली, “माझा वापर केलास आणि…”
या फोटोला कॅप्शन देताना ती म्हणते, “चाळीतली दिवाळी, यावर्षी दिवाळी जरा वेगळी वाटते. पुढच्या वर्षी ती अजून वेगळी असणार आहे, हे माहित आहे म्हणून कदाचित. वरळीतील घरी गेल्यावर माझे संपूर्ण बालपण आणि आदर्श नगरमध्ये साजरा झालेला प्रत्येक सण मला आठवतं. जरी आपण कितीही मोठे झालो, तरी चाळीत साजरे केलेले सण सगळ्यात खास राहतील.” तिची ही पोस्ट चाहत्यांना प्रचंड आवडली असून या पोस्टवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. त्याचबरोबर, अनेकांनी तिला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हे देखील वाचा – Video : सायली संजीवच्या टॅटूने वेधलं साऱ्यांचंच लक्ष, खास व्यक्तीच्या आठवणीमध्ये कोरला अन्…; त्याचा अर्थ नेमका काय?
अक्षया ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून घराघरात पोहोचली. ज्यात तिने साकारलेल्या ‘लतिका’ या पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. सध्या तिचं रंगभूमीवर ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ हे नाटक सुरु आहे, जे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतंय. त्याचबरोबर, ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून विविध फोटोज व व्हिडीओज शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.