सामान्य माणसू असो किंवा कोणताही सेलिब्रिटी काही गोष्टी या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात असणं गरजेचं असत. आयुष्याच्या प्रवासात सोबत असणारा प्रवासी हा आपल्याला तितकाच समजून घेणारा असला कि जगणं अजून सुंदर होत. आनंदात असो किंवा दुःखात प्रत्येक वळणावर सोबत असणारा सोबती मिळणं हे फार भाग्याचं असत.(Balumama Fame Sumeet Pusavle)
एकमेकांच्या आनंदात आनंदी असणार असच एक गोड कुटुंब आपल्या मराठी मनोरंजन विश्वात आहे. कलर्स मराठी वाहिनी वरील बाळू मामाच्या नावं चांगभलं या मालिकेत बाळू मामा यांची भूमिका साकारणारा अभिनेता सुमित पुसावळे त्याच्या दमदार भूमिकेमुळे चांगलाच प्रसिद्ध आहे. बाळूमामा हि कलर्स मराठी वरील मालिका प्रेक्षक श्रद्धेने पाहत असतात. सोबतच सुमितला या मालिकेने एक वेगळी ओळख देखील दिली आहे. काही महिन्यांपूर्वीच सुमित लग्नबंधनात अडकला. नुकतंच पार पडलेल्या कलर्स मराठी अवॉर्ड २०२३ च्या रेड कार्पेट वर सुमित ने सपत्नीक उपस्थति लावली होती.
एकमेकांना अगदी साजेसे तयार होऊन दोघांनी रेड कार्पेट वर ग्रँड एन्ट्री घेतली. या वेळी लग्नानंतरच्या पहिल्या रेड कार्पेटवर आल्यावर दोघांनी आपआपल्या भावना व्यक्त केल्या आणि या अनुभवाबद्दल आपलं मत देखील मांडलं. सुमितच्या पत्नीचं नाव मोनिका आहे. रेड कार्पेट वर हि जोडी अगदी शोभून दिसत होती.(Balumama Fame Sumeet Pusavle)
मीडिया सोबत सवांद साधताना जेव्हा मोनिकाला उखाणा घ्यायला सांगण्यात आला तेव्हा मात्र मोनिकाने सुमित साठी सुंदर उखाणा घेतला आणि एकच टाळ्यांचा सूर येऊ लागला. सुमितसाठी मोनिकाने ‘चांदीच्या ताटात खडीसाखरीचे खडे सुमित रावांचं नाव माझ्या हृदयात खिले’ असा सुंदर उखाणा घेतला. या दोघांच्या जोडीचं इतर कलाकारांकडून देखील कौतुक केलं गेलं शिवाय सोशल मीडियावर हि प्रेक्षक या जोडीला चांगलीच पसंती देत आहेत.